• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नीरजला लॉरेओ पुरस्कारासाठी नामांकन; दिली प्रतिक्रिया

by pravin
February 3, 2022
in अन्य खेळ
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

लंडन – ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला बुधवारी प्रतिष्ठेच्या लॉरेओ ‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’ पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. या विभागात नामांकन मिळालेला नीरज हा पहिलाच भारतीय क्रीडापटू ठरला.

२३ वर्षीय नीरजने गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला होता. त्याने भालाफेकीच्या अंतिम फेरीत ८७.५८ मीटर अंतराची नोंद करत भारताला ऑलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धातील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले. या कामगिरीची आता लॉरेस पुरस्कारांकडून दखल घेण्यात आली आहे. ‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’ या पुरस्कारासाठी नीरजसह रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव, ब्रिटनची टेनिसपटू एमा रॅडूकानू, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू प्रेडी, तिहेरी उडीपटू युलिमर रोहास आणि जलतरणपटू अरिअर्ने टिटमस हे खेळाडू शर्यतीत आहेत. विजेत्यांच्या नावांची एप्रिलमध्ये घोषणा करण्यात येईल.

टोक्यो ऑलिम्पिकमधील माझ्या कामगिरीची दखल घेण्यात आली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. केवळ तंदुरुस्त राहण्यासाठी खेळाकडे वळणारा भारताच्या ग्रामीण भागातील एक मुलगा, ते ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता हा प्रवास खूपच अद्भूत राहिला आहे. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि जागतिक स्तरावर भारताला पदके मिळवून देणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता तारांकित खेळाडूंसह लॉरेस पुरस्कारासाठी नामांकन मिळणे हे खूपच खास आहे. अशी प्रतिक्रिया नीरजने व्यक्त केली.

Tags: landanloreo awardsneeraj chopranominated
ShareTweetSend
Next Post

महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धात बोपण्णा-रामनाथन जोडीचा विजय;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.