• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल ; यजमान महाराष्ट्र मुले व मुली विजेते पदक

सी.बी.एस.ई., दिल्ली द्वितीय व छत्तीसगढ यांना तृतीय पदक

by pravin
January 28, 2025
in राष्ट्रीयस्तरीय, सॉफ्टबॉल
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल ; यजमान महाराष्ट्र मुले व मुली विजेते पदक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):  भारतीय शालेय खेळ महासंघ S.G.F.I. व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 68वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल  19 वर्षे मुले व मुली क्रीडा स्पर्धा चे आयोजन दिनांक 24 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे यशस्वी आयोजन आज रोजी संपन्न झाले.

स्पर्धेचे शेवटच्या दिवशी  दिनांक 27 जानेवारी 2025 रोजीच्या सकाळच्या सत्रामध्ये बक्षिस वितरण  खासदार डॉ. भागवत  कराड,राज्यसभा सदस्य यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी . मकरंद जोशी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी,प्रदिप तळवळकर, सचिव, महाराष्ट्र सॉफ्टबॉल, युवराज नाईक, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर विभाग, नटवर सिंह, एस.जी.एफ. आय, किशोर चौधरी, साकेर अली, एस.जी.एफ.आय. राजस्थान, सुबोध मिश्रा, एस.जी.एफ.आय.राजस्थान, विजय गौर, एस.जी.एफ.आय. दिल्ली,  मृत्युंजय शर्मा ,एस.जी.एफ.आय.छत्तीसगढ बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी  खासदार डॉ. भागवत  कराड,राज्यसभा सदस्य यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना खेळामुळे आरोग्य निरोगी राहून सांघिक खेळामुळे एकात्मता वाढील लागते असे मनोगत व्यक्त करून विजेत्या संघांना शुभेच्छा देऊन सहभागी संघांना प्रयत्नात सातत्य ठेवावे असे सांगितले.

अंतिम निकाल
19 वर्षाखालील मुले
1. महाराष्ट्र
2. CBSE
3. छत्तीसगड.

19 वर्षाखालील मुली
1. महाराष्ट्र
2. दिल्ली
3. छत्तीसग

स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आज झालेल्या सामन्यासाठी पंच प्रमुख अक्षय येवले,शिवाजी पाटील, विकास वानखेडे, कल्पेश कोल्हे, प्रज्वल जाधव, मंगेश इंगोले, मयुरेश औसेकर, प्रविण गडका,गणेश बेटूदे,अक्षय बिरादार व पंच सहाय्यक सचिन बोर्डे,भीमा मोरे, रोहीत तूपारे, यश थोरात, निखील वाघमारे, गौरव साळवे, मयुरी गामके, ईश्वरी शिंदे, मयुरी चव्हाण, सायली किरगत, विशाल जारवाल, कार्तीक तांबे, शुभम जारवाल, गौरव खरे यांनी भूमिका निभावली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे,लता लोंढे, खंडू यादवराव, रामकिशन मायंदे, गणेश पाळवदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक पूनम नवगिरे, सचिन पुरी, वरीष्ठ लिपिक सदानंद सवळे, अनिल दांडगे, सचिन बोर्डे, क्रीडा शिक्षक बी.व्ही. होण्णा, राकेश खैरनार, रफिक जमादार, प्रवीण शिंदे, गणपत पवार,प्रशांत पांडे, राणा कदम, बाजराव भूतेकर,गौरव साळवे, निखिल वाघमारे,शुभम जारवाल, निखिल वाघमारे,सह राज्य संघटना अधिकारी व छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी आदीं परिश्रम घेतले आहे.

Tags: Host Maharashtra boys and girls win medalslatest sports news marathimaharashtra stateNational School Softball newsPuneSchool Games Federation of India S.G.F.I. and Directorate of Sports and Youth Services
ShareTweetSend
Next Post
राज्य क्रीडा दिनानिमित्त क्रीडा शिक्षकांची कार्यशाळा संपन्न

राज्य क्रीडा दिनानिमित्त क्रीडा शिक्षकांची कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.