• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा; महिलांमध्ये महाराष्ट्राला तर पुरुषांमध्ये रेल्वेला सुवर्णपदक

by pravin
December 31, 2021
in खो-खो, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

जबलपूर(बाळ तोरसकर) :- ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी सुवर्णपदक मिळवताना भारतीय विमान प्राधिकरणाला धूळ चारली. तर भारतीय रेल्वेने सुसाट खेळी करताना महाराष्ट्राच्या दुहेरी मुकूटाच्या हॅट्रिक मिळवण्याच्या स्वप्नांचा चुराडा केला. या स्पर्धेत महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा दिला जाणार्‍या राणी लक्ष्मीबाई पुरस्कारावर महाराष्ट्राची कर्णधार प्रियांका इंगळेने नाव कोरले. तर पुरुषांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा दिला जाणार्‍या एकलव्य पुरस्कारावर रेल्वेच्या महेश शिंदेने नाव कोरले आहे. महिलांमध्ये महाराष्ट्राला २३ वे तर पुरुषांमध्ये रेल्वेला १० वे अजिंक्यपद मिळाले आहे. या वर्षीचे महाराष्ट्राचे हे पाचवे अजिंक्यपद आहे. (सब जूनियर गटाचे दोन व जूनियर गटाचे दोन व खुल्या गटाचे एक अशी पाच अजिंक्यपद मिळाली आहेत.

 

 

महिलांच्या अंतिम सामान्यत महाराष्ट्राने भारतीय विमान प्राधिकरणाचा १३-११ (मध्यंतर ७-६) असा २ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (कर्णधार) (१:३०, २:१० मि. संरक्षण व ३ बळी), रेश्मा राठोड (१:४०, २:०० मि. संरक्षण व २ बळी), अपेक्षा सुतार (१:३०, १:५० मि. संरक्षण व १ बळी), रुपाली बडे (१:२०, २:०० मि. संरक्षण), स्नेहल जाधव (१:५० मि. संरक्षण व १ बळी), पूजा फरगडे (३ बळी) यांनी चतुरस्त्र खेळी करताना महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. विमान प्राधिकरणाच्या प्रियंका भोपी (२:००, २:२० मि. संरक्षण व ३ बळी), ऐश्वर्या (२:००, १:५० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत दिली मात्र त्या आपल्या संघाला परभवापासून वाचवू शकल्या नाहीत.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा; महिलांमध्ये महाराष्ट्राला तर पुरुषांमध्ये रेल्वेला सुवर्णपदक

 

 

पुरुषांच्या अंतिम सामान्यत रेल्वेने महाराष्ट्राचा १४-१३ (मध्यंतर ८-७) असा १:४० मि. राखून एक गुणाने विजय मिळवला. खरतर सुसाट सुटलेल्या रेल्वेला रोखण्यात महाराष्ट्राचे पुरुष अपयशी ठरले. रेल्वेच्या महेश शिंदे (२:००, १:१० मि. संरक्षण व २ गडी), दिपेश मोरे (१:५०, १:१० मि. संरक्षण व २ गडी) व मिलिंद चावरेकर (१:३०, १:१० मि. संरक्षण व १ गडी) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. तर महाराष्ट्राच्या प्रतीक वाईकर (१:३०, १:०० मि. संरक्षण व १ गडी), सागर लेंगरे (१:४० मि. संरक्षण) व अक्षय भांगरे (१:१०, १:०० मि. संरक्षण व १ गडी) यांनी दिलेली लढत कमी पडल्यानेच रेल्वेला सुवर्णपदक मिळू शकले.

 

 

 

तृतीय क्रमांकाच्या पुरुषांच्या सामन्यात कोल्हापूर तर महिलांच्या सामन्यात कर्नाटक विजयी ठरले तर दोन्ही गटात अनुक्रमे कर्नाटक व हरयाणा चौथ्या क्रमांकावर राहिले.

Tags: ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धामहिलांमध्ये महाराष्ट्राला तर पुरुषांमध्ये रेल्वेला सुवर्णपदकराष्ट्रीय खो-खो स्पर्धा
ShareTweetSend
Next Post

बीसीसीआयने कनिष्ठ गटातील महत्त्वपूर्ण स्पर्धा स्थगित केली आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.