• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा ;कोल्हापूर,गोव्याची विजयी सलामी

by pravin
December 27, 2021
in खो-खो, राष्ट्रीयस्तरीय, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई :- ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर या कलावधीत एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित केली आहे. २६ डिसेंबर (शनिवार) रोजी  स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले. या उद्घाटन समारंभाला प्रल्हाद पटेल (राज्य मंत्री भारत सरकार), राकेश सिंह (खासदार) विवेक तन्खा (खासदार), अजय बिश्नोई (आमदार), भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी, सहसचिव चंद्रजीत जाधव व भारतीय खो-खो महासंघाचे विविध पाधाधिकारी, मध्य प्रदेश खो-खोचे पाधाधिकारी व खोखो प्रेमी उपस्थित होते. तीन मातीची तर एक मॅटचे मैदान या स्पर्धेसाठी तयार केले आहे.

 

या स्पर्धेत आज कोल्हापूर, गोव्याने विजयी सलामी दिली. या स्पर्धेत पुरुषांमध्ये अंदमान-निकोबार, नागालँड व सिक्किम तर महिलांमध्ये अंदमान-निकोबार, नागालँड, चंडीगढ व आसाम या राज्यांनी कोविड परिषतीतीमुळे स्पर्धेत भाग घेऊ शकत नसल्याचे कळविले असल्याचे समजते. नागालँड संघ न आल्याने महाराष्ट्राच्या २६ डिसेंबर (शनिवार) रोजीच्या दोन्ही संघाच्या लढतीत पुढे चाल देण्यात आली.

 

२६ डिसेंबर (शनिवार) रोजीच्या झालेल्या महिलांच्या ‘ड’ गटातील साखळी सामन्यात कोल्हापूरने अरुणाचल प्रदेशचा १६-०३ असा एक डाव १३ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात कोल्हापूरच्या ऋतुजा खाडे (२:१० मि. संरक्षण व २ बळी), श्रेया पाटील (२:५० मि. संरक्षण व ३ बळी) यांनी चमकदार कामगिरीची नोंद केली. मात्र अरुणाचलच्या कोणत्याही खेळाडूला विशेष कामगिरी करता आली नाही.

 

पुरुषांच्या ‘ह’ गटातील साखळी सामन्यात गोव्याने जम्मू-काश्मीरवर १८-१७ असा १:३० मि. राखून एक गुणाने विजय संपादन केला. मध्यातराला गोव्याने १२-०६ अशी ६ गुणांची मोठी आघाडी घेतली होती मात्र उत्तरार्धात जम्मू-काश्मीरने जोरदार लढत दिली. मध्यंतराच्या ६ गुणांच्या आघाडीनेच गोव्याचा विजय सुकर झाला. या सामन्यात गोव्याचा कर्णधार सॅवियो नोरोन्हा (३:१० मि. संरक्षण व ३ गडी), प्रवेश वेळीप (१:१०, १:२० मि. संरक्षण व ४ गडी) यांनी अष्टपैलू खेळ करत सहज विजय सांपदन केला. तर जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंना विशेष चमक दाखवता आली नाही.

 

ShareTweetSend
Next Post

बेंगलोरने रोखला बंगालचा विजयरथ; कोरियन लीची कमाल

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.