• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नॅशनल गेम्स २०२२ तलवारबाजी; अजिंक्य दुधारे, गिरीश जकातेला कांस्य पदक

by pravin
October 1, 2022
in तलवारबाजी, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
नॅशनल गेम्स २०२२ तलवारबाजी; अजिंक्य दुधारे, गिरीश जकातेला कांस्य पदक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

गांधीनगर- 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी खेळात अजिंक्य दुधारे व गिरीश जकाते या खेळाडूंनी महाराष्ट्र संघास दोन कांस्यपदके मिळवून दिली. अजिंक्य दुधारे याने इप्पी प्रकारात वैयक्तिक साखळी सामन्यात चांगले प्रदर्शन करून बाद फेरीत प्रवेश मिळवला. बाद फेरीमध्ये केरळच्या आलिशियोस जोशी यास (15 -14 गुण ) अटीतटीच्या सामन्यात पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपउपांत्य फेरीमध्ये ओडिशाच्या प्रवीण कुमारचा (15 -6) गुणांनी सहज पराभव करीत अजिंक्य दुधारे याने उपांत्य फेरीत धडक मारली व पदक निश्चित केले.उपांत्य फेरीमध्ये छत्तीसगडच्या सर्जन सोबत (9 -15) गुणांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अजिंक्य दुधारे याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

गिरीश जकाते याने इप्पी वैयक्तिक प्रकारात चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत बाद फेरीत प्रवेश मिळवला. बाद फेरीमध्ये तेलंगणाच्या वेमानीचा (15- 12) गुणांनी पराभव करीत त्याने उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. यामध्ये सेनादलाच्या बलाढ्य खेळाडू संतोष सिंग याचा (15 -10) गुणांनी पराभव करून गिरीश जकाते याने उपांत्य फेरी गाठली.

उपांत्य फेरीमध्ये पंजाबच्या उदयवीर सिंग सोबत (7-15) गुणांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे गिरीश जकातेला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.तलवारबाजी स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्र संघाने दोन कांस्य पदके जिंकून पदक तालिकेत पदकांची भर घातली. या कामगिरीवर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणीचे सदस्य व महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे, अशोक दुधारे, संघाचे प्रशिक्षक स्वप्नील तांगडे, संजय भुमकर, शोएब मोहंमद , प्रकाश काटोळे, राजकुमार सोमवंशी व नयना नायर यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र संघातील आणखी काही खेळाडू पदक जिंकतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

 

Tags: Ajinkya DudhareAshok DudhareDr. Uday DongreGirish Jakate bronze medalNational Games 2022 FencingRemove term: National Games 2022 Fencing National Games 2022 Fencing newsSanjay Bhumkarteam coach Swapnil Tangde
ShareTweetSend
Next Post
टेनिसमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश

टेनिसमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.