• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

मयुरी लुटेची पदार्पणात पदकाची हॅट्रिक साजरी; महाराष्ट्राला सायकलिंग मध्ये सुवर्णपदक

by pravin
October 3, 2022
in नॅशनल गेम्स, सायकलिंग
Reading Time: 1 min read
मयुरी लुटेची पदार्पणात पदकाची हॅट्रिक साजरी; महाराष्ट्राला सायकलिंग मध्ये सुवर्णपदक

मयुरी लुटे सायकलिंग सुवर्ण पदक विजेती

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

अहमदाबाद- राष्ट्रकुल स्पर्धेतील सहभागी भारतीय संघाची सदस्य खेळाडू मयुरी लुटेने 36व्या नॅशनल गेम्स मध्ये दमदार पदार्पण करताना पदकांची हॅट्रिक साजरी केली. तिने सोमवारी टीम स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राला किताबाचा बहुमान मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट मयुरी लुटे शशिकला आगाशे आणि आदिती डोंगरे ने टीम स्प्रिंट प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

यासह महाराष्ट्राच्या नावे सायकलिंग मध्ये तिसऱ्या पदकाची नोंद झाली. यादरम्यान मयुरी लुटेची कामगिरी लक्षवेधी ठरली.

सोमवारी दुपारच्या सत्रामध्ये सायकलिंगच्या टीम स्प्रिंगचा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या प्रकारामध्ये महाराष्ट्र संघाने सर्वोत्तम कामगिरी साधली. थ्री लॅपच्या या इव्हेंट मध्ये महाराष्ट्र संघाने 503 गुणांची कमाई केली. यासह महाराष्ट्र संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यातून महाराष्ट्राच्या मयुरी लुटेला स्पर्धेत तिसरे पदक आपल्या नावे करता आले. आता तिच्या नावे वैयक्तिक दोन पदकासह एका सांघिक पदकाचा समावेश आहे. तिने दोन सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले आहे.

 

महाराष्ट्राची कामगिरी सर्वोत्तम: प्रशिक्षक पाटील

दिल्ली येथील वेलोड्रामावर महाराष्ट्र संघ सर्वोत्तम कामगिरी साधत आहे. त्यामुळे संघाला पदकाची कमाई करता येत आहे. दिल्लीच्या मैदानावर महाराष्ट्र संघाने उल्लेखनीय कामगिरी करताना पदकाची ध्वजा उंच उभारली आहे. त्यामुळे संघाला हे सर्वोत्तम यश संपादन करता आले. यामुळे संघ सर्वोत्तम ठरला, अशा शब्दात प्रशिक्षक दिपाली पाटील यांनी संघावर कौतुकाचा वर्षाव केला.

Tags: 36th National Games36th National Games cycling newsAditi DongreGold medal for Maharashtra in cyclingMayuri LuteSasikala Agashe
ShareTweetSend
Next Post
महाराष्ट्र संघाची तिसऱ्या स्थानावर धडक;पदक तालिकेत महाराष्ट्राचे 60 पदके

महाराष्ट्र संघाची तिसऱ्या स्थानावर धडक;पदक तालिकेत महाराष्ट्राचे 60 पदके

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.