• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

माथाडी कामगारांच्‍या मुलाने गाजवले खेलो इंडिया, वैभवची सुवर्णासह पदक हॅटट्रिक

महाराष्ट्राला कबड्डीत कांस्यपदक, पदकतक्‍यात दुसरे स्‍थान

by pravin
May 24, 2025
in खेलो इंडिया बीच स्पर्धा
Reading Time: 1 min read
माथाडी कामगारांच्‍या मुलाने गाजवले खेलो इंडिया, वैभवची सुवर्णासह पदक हॅटट्रिक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दीव (प्रतिनिधी): माथाडी कामगाराचा मुलगा असणाऱ्या वैभव वाल्‍मिक काळेने पहिल्‍या खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्रासाठी पदकांचा हॅटट्रिकचा पराक्रम केला आहे. वैभवने सुवर्ण, रौप्‍य व कांस्य अशी तिरंगी पदके जिंकण्याचा करिश्मा घडविला आहे. कबड्डी महाराष्ट्राच्‍या दोन्‍ही संघांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले असून पदकतक्‍यात ५ सुवर्णांसह एकूण १८ पदके जिंकून महाराष्ट्र दुसऱ्या स्‍थानावर आहे.

घोघला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्‍या पारंपारिक पेंचक सिलट प्रकारात महाराष्ट्राच्‍या वैभव वाल्‍मिक काळेने सुवर्ण पदक जिंकून पदकाच्‍या हॅटट्रिकची सुवर्णसांगता केली. ६० ते ६५ किलो वजनी गटाच्‍या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्‍या २३ वर्षीय वैभवने आसामच्‍या प्रांजल राभा विरूध्द १७-४ गुणांनी एकतर्फी विजय मिळविला. वैभवचे हे स्‍पर्धेतील तिसरे पदक आहे. वैयक्‍तिक प्रकारात कांस्य, रेंगु सांघिक प्रकरात रौप्‍य पदकाची लयलूट वैभवने केली आहे. स्‍पर्धेत तिरंगी पदक जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.

वैभवचे वडिल वाल्‍मिक काळे हे मुंबईतील वाशी बाजार समितीत माथाडी कामगार आहेत. ठाणे शहरात सराव करणाऱ्या वैभवने आशियाई स्‍पर्धेत रौप्‍य पदक पटकावले असून जागतिक स्‍पर्धेत त्‍याने भाग घेतला आहे. हमाली करणाऱ्या माझ्या वडिलांना हे पदक अर्पण करतो असे सांगून वैभव म्‍हणाला की, खेलो इंडियातील ही पदके आंतरराष्ट्रीय यशासाठी प्रोत्‍साहन देणारे आहेत.

बीच कबड्डीतील महिला उपांत्‍य लढतीत हिमाचल प्रदेशने महाराष्ट्राचा ५२-४१ गुणांनी पराभव केला. साखळी सामन्यात छत्तीसगड, दीव व दमन संघाचा धुव्‍वा उडवून महाराष्ट्राने उपांत्य फेरीत मजल मारली होती. पूर्वार्धात महाराष्ट्राचे आक्रमण ढसाळ झाल्‍याने हिमाचल प्रदेशने २८-१७ अशी ११ गुणांची आघाडी घेतली होती. उत्तरार्धात गार्गी साखरे , हर्षा शेट्टी यशस्‍वी चढाया केल्‍या. आघाडी कमी होऊ शकली नसल्‍याने महाराष्ट्राला पराभव स्‍वीकारावा लागला.

पुरूषांच्‍या उपांत्‍य लढतीत हरियाणाने महाराष्ट्रावर ५२-२७ गुणांनी मात केली. दोन्‍ही गटातील सुवर्णपदके बलाढ्य हरियाणाने जिंकून आपले वर्चस्‍व गाजवले. बीच सॉकरमधील पुरूष गटात महाराष्ट्राला ३-१६ गोलने पराभूत करून केरळने अंतिम फेरीत मजल मारली आहे.

पदकतक्‍यात

५ सुवर्ण, ४ रौप्‍य, ९ कांस्य एकूण १८ पदके जिंकून महाराष्ट्र दुसऱ्या स्‍थानावर आहे. ५ सुवर्ण, ५ रौप्‍य, ३ कांस्य एकूण १३ पदकां कमाई करीत मणिपूरने अव्‍वल स्‍थान गाठले आहे. सर्वसाधारण विजेतेपदासाठी मणिपूर, महाराष्ट्र आणि हरियाणात शर्यत रंगली आहे.

Tags: Khelo India Beach Tournament newsMaharashtra wins bronze medal in KabaddiMathadi workers' son wins Khelo Indiasecond place in medal table
ShareTweetSend
Next Post
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गुणवंत राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गुणवंत राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.