• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

मालविका बनसोड अंतिम फेरीत बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राचे एक पदक निश्चित

by pravin
October 5, 2022
in नॅशनल गेम्स, बॅडमिंटन
Reading Time: 1 min read
मालविका बनसोड अंतिम फेरीत बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राचे एक पदक निश्चित
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

बडोदा –  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची अव्वल बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिने अंतिम फेरी गाठली आहे. सुवर्ण पदकासाठी गुरुवारी मालविकाचा सामना आकर्शी कश्यपशी होणार आहे.बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोड हिने अंतिम फेरी गाठून महाराष्ट्राचे एक पदक निश्चित केले आहे. मालविका आणि आकर्शी यांच्यात अनेक लढती झालेल्या असून दोन्ही खेळाडू तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होणार आहे.

उपांत्य सामन्यात मालविका बनसोड हिने अदिती भट हिचा 21-10, 19-21, 21-13 अशा फरकाने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. डावखुऱ्या मालविका बनसोड हिने अदिती भट विरुद्ध पहिला गेम 21-10 असा सहज जिंकून सामन्यात आघाडी घेतली. मालविकाने पहिला गेम झटपट जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये अदिती भट हिने जोरदार प्रत्युत्तर देत दुसरा गेम 21-19 असा जिंकून सामन्यात रंगत आणली.

बडोदा -  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची अव्वल बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिने अंतिम फेरी गाठली आहे. सुवर्ण पदकासाठी गुरुवारी मालविकाचा सामना आकर्शी कश्यपशी होणार आहे.बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोड हिने अंतिम फेरी गाठून महाराष्ट्राचे एक पदक निश्चित केले आहे. मालविका आणि आकर्शी यांच्यात अनेक लढती झालेल्या असून दोन्ही खेळाडू तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होणार आहे.

उभय खेळाडूंनी 1-1 गेम जिंकला असल्याने निर्णायक तिसऱ्या गेमच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. मालविका बनसोड हिने तिसरा गेम 21-13 असा जिंकून अदिती भटचे आव्हान संपुष्टात आणले. उपांत्य सामन्यात मालविका बनसोडला विजयासाठी थोडा संघर्ष करावा लागला. खास करून दुसऱ्या गेममध्ये अदितीने जोरदार प्रत्युत्तर दिले. या लढतीत मालविका हिने उत्कृष्ट रॅलीचा खेळ केला. बॅकहॅन्ड, फोरहॅंड फटक्यांनी मालविकाने अदितीवर दबाव बनवला आणि सामना जिंकून मालविका हिने बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

बॅडमिंटन प्रशिक्षक अक्षय देवलकर यांनी सांगितले की उपांत्य फेरीत मालविका सहज जिंकण्याची खात्री होती. विजय थोडं लांबला एवढंच. अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडू तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. सुवर्ण पदकासाठी दोघांमधील अंतिम लढत रंगतदार ठरेल.

गोल्ड हेच टार्गेट : मालविका बनसोड
अंतिम फेरी गाठल्यावर मालविका बनसोड म्हणाली की, उपांत्य सामना जिंकण्यासाठी तीन गेम खेळावे लागले. दुसऱ्या गेममध्ये काही चुका झाल्याने सामना तिसऱ्या गेम पर्यंत गेला. अंतिम सामन्यात माझा सामना आकर्शी कश्यपशी होणार आहे. आम्ही दोघांनी अनेक फायनल्स खेळलो आहोत. हा अंतिम सामना प्रेक्षणीय ठरणार. अर्थात सुवर्ण पदक जिंकणे हेच मुख्य टार्गेट आहे अशी प्रतिक्रिया मालविका बनसोड हिने व्यक्त केली आहे.

Tags: 36th National Games Badminton36th National Games badminton news36th National Games Basketball finalMalvika Bansodsecures a medal
ShareTweetSend
Next Post
महाराष्ट्र बॉक्सिंग च्या इतिहासातील एक वेगळेच यश शिवाजी महाराजांच्या कळातील एक पुनरावृत्ती गड आला पण सिंह गेला

...तर महाराष्ट्राचे सुवर्णपदक हुकले असते!!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.