स्पोर्ट्स पॅनोरमा | मुंबई
राज्यातील तालुका क्रीडा अधिकारी (गट-ब, राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी (३० जून) शासन आदेश जारी करत राज्यातील १६ तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून चार अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरचे तालुका क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे बदली करण्यात आली आहे. तर कणकवलीचे तालुका क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे यांची पुणे मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही आदेशात समावेश आहे.
शासनाने संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी विहित मुदतीत रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक कामकाजासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित जबाबदारी पूर्ण होईपर्यंत कार्यमुक्त करू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
खालीलप्रमाणे अधिकाऱ्यांची नवीन पदस्थापना आणि मुदतवाढ करण्यात आली आहे:
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी:
| अ.क्र. | अधिकाऱ्याचे नाव | सध्याची पदस्थापना | बदलीनंतरची नवीन पदस्थापना |
| १. | श्री. राजेंद्र अतनूर | माणगांव (जि. रायगड) | जत (जि. सांगली) |
| २. | श्री. अविनाश टिळे | इगतपुरी (जि. नाशिक) | नांदगांव (जि. नाशिक) |
| ३. | श्री. अरविंद चौधरी | नांदगांव (जि. नाशिक) | इगतपुरी (जि. नाशिक) |
| ४. | श्री. जगदीश चौधरी | चाळीसगाव (जि. जळगांव) | ऐरंडोल (जि. जळगांव) |
| ५. | श्री. श्याम देशपांडे | कणकवली (जि. सिंधुदुर्ग) | मुख्यालय, पुणे |
| ६. | श्री. सुरेंद्र कराड | रेणापूर (जि. लातूर) | गेवराई (जि. बीड) |
| ७. | श्री. बाजीराव देसाई | गंगापूर (जि. छ. संभाजीनगर) | कणकवली (जि. सिंधुदुर्ग) |
| ८. | श्री. जयकुमार टेंभरे | कळमनुरी (जि. हिंगोली) | खेड (जि. पुणे) |
| ९. | श्री. चारुदत्त नाकट | लाखांदूर (जि. भंडारा) | पातुर (जि. अकोला) |
| १०. | श्रीमती जयश्री देवकर | कोरपणा (जि. चंद्रपूर) | खटाव (जि. सातारा) |
| ११. | श्री. मिलिंद काटोलकर | मेहकर (जि. बुलढाणा) | अचलपूर (जि. अमरावती) |
| १२. | श्रीमती प्राजक्ता सावंत | कुर्ला (जि. मुंबई उपनगर) | सालेकसा (जि. गोंदिया) |
दरम्यान, भूमचे श्रीकांत हरनाळे, मुलचे विनोद ठिकरे, मुर्तीजापूरचे सतीशचंद्र भट आणि देऊळगाव राजाचे बाळकृष्ण महानकर यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.




