• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

कोरिया रिपब्लिकचा व्हिएतनामवर सहज विजय

by pravin
January 21, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, फुटबॉल
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे (प्रतिनिधी) : कोरिया रिपब्लिक संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या आपल्या मोहिमेस चांगली सुरवात केली. त्यांनी शुक्रवारी येथील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सी गटातील सामन्यात त्यांनी व्हिएतनामचा ३-० गोलने पराभव केला.
सामन्याच्या चौथ्या मिनिटाला जी सो युन हिने पहिला गोल केला. त्यानंतर व्हिएतनामला त्रान थी फुओंग हिच्याकडून झालेल्या स्वयंगोलचा फटका बसला. दुसऱ्या सत्रात चेल्सीची मध्यरक्षक जी हिनेच गोल करत कोरियाचा विजय साकार केला.

सामन्याच्या सुरवातीलाचा गोल करायच्यायाच उद्देशाने जणू कोरियाच्या मुली मैदानात उतरल्या होत्या. सुरवातीपासून त्यांनी कमालीचा वेगवान खेळ केला. तिसऱ्याच मिनिटाला चोए यु री हिने झकास धाव घेत आॅफसाईडची अडचण दूर केली. डाव्या बाजूने तिने मारलेली कीक गोलपोस्टला धडकून मैदानात परत आली तेव्हा सोन वा येआन ऑफसाइड ठरली. त्यामुळे त्यांचा हा पहिलाच प्रयत्न अपयशी ठरला. अर्थात, कोरियाच्या खेळावर याचा काही एक परिणाम झाला नाही. त्यांनी उलट आणखी वेगवान खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवरील दडपण वाढवले. चोए हिने सुरेख धाव घेत जी सो यूनला हेरत पास दिला आणि कर्णधार जी हिने ही संधी साधून चेंडूला जाळीची दिशा देत कोरियाला आघाडीवर नेले.

कोरियासाठी आज चोए हिचा खेळ जबरदस्त झाला. व्हिएतनामचा बचाव भेदण्याचा आणि चाली रचण्याची सगळी जबाबदारी जणू तिने घेतली होती. सातव्या मिनिटाला पुन्हा एकदा तिने अशीच धडकी भरवणारी चाल केली. तिने पुन्हा एकदा सो कडे पास दिला. पण, हवेतून आलेला पास क्लिअर करण्याच्या नादात व्हिएतनामच्या त्रान हिने केलेले हेडिंग चुकले आणि चेंडू त्यांच्याच गोलपोस्टमध्ये गेला.

कॉलिन बेल यांच्या कोरियन खेळाडूंच्या वेगवान खेळ आणि एकामागून एक होणाऱ्या आक्रमणाने व्हिएतनामची गोलरक्षक त्रान हिला सगळ्यात जास्त सतर्क रहावे लागले. सामन्यावर नियंत्रण मिळविल्यावर मात्र कोरियन खेळाडूंनी सामन्याचा वेग कमी केला. संपूर्ण खेळ व्हिएतनामच्याच बाजूला खेळला जात होता. त्यातही सामन्याच्या ३८व्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची एक संधी मिळाली. त्या वेळी चुआँग थी किएऊ हिने मारलेल्या किकवर त्यांचे आक्रमक अचूक हेडर करू शकले नाहीत.

सामन्याच्या उत्तरार्धात ताएगुक यांच्या मुलींनी चेंडूचा ताबा आपल्याकडे राखताना आक्रमक खेळाचा प्रयत्न केला. व्हिएतनामच्या या पवित्र्यामुळे एकवेळ कोरियन खेळाडूंना जरूर रोखले होते. पण, कोरियन मुलींना आणखी एक गोल जणू खुणावत होता. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या खेळाला वेग दिला . सामन्याच्या ७४व्या मिनिटाला गोल करण्याची संधी त्यांना साधता आली नाही. व्हिएतनामच्या गोलरक्षक त्रान हिने त्यांना गोल करण्यापासून रोखले. दुसऱ्या सत्रात व्हिएतनामचा बचाव पूर्वाधार्पेक्षा अधिक तगडा झाला. पण, ७९व्या मिनिटाला चोऊंग हिच्याकडून गोलकक्षात चेंडू हाताळला गेल्याने कोरियाला पेनल्टी किक देण्यात आली. ही संधी साधताना कर्णधार जी हिने अगदी मैदानालगत किक मारत कोरियाचा तिसरा गोल केला.

कोरिया आता सोमवारी आपली दुसरी लढत म्यानमारशी खेळेल, तर व्हिएतनामचा सामना गतविजेत्या जपानशी होईल.

Tags: WAC2022 KORvVIE
ShareTweetSend
Next Post

चायनीज तैपेई विरुद्ध भारत

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.