• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक

by pravin
February 3, 2022
in फुटबॉल
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे ०३ फेब्रुवारी २०२२ – कोरिया रिपब्लिकने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२  स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना फिलिपाईन्सचे कडवे आव्हान २-० गोलने परतावले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्याच सत्रात दोन गोल करत कोरिया रिपब्लिकने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे  कोरिया रिपब्लिकने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. चो सो-ह्यून आणि सोन हवा-येओन यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाचा विजय साकारला.

फिलिपाईन्सचा पराभव झाला असला, तरी त्यांची कामगिरी प्रभावित करणारी ठरली. स्पर्धेच्या इतिहासामध्ये फिलिपाईन्सने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर त्यांना ऑस्ट्रेलिय-न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होण्याची संधी मिळू शकते.

विजयाच्या निधार्रानेच मैदानात उतरलेल्या कोरिया रिपब्लिकने थोडाही वेळ वाया न घालवता फिलिपाईन्सच्या गोलक्षेत्रात आक्रमण केले आणि चौथ्याच मिनिटाला पहिला गोल केला. सामनावीर ठरलेली चो हिने किम ह्ये-रीच्या कॉर्नर किकवर अप्रतिम हेडर मारला आणि चेंडू फिलिपाईन्सची गोलकीपर ऑलिवा मॅकडेनियलला चकवून गोलजाळ्यात गेला. यानंतर पहिल्याच उपांत्य सामन्यात खेळत असलेल्या फिलिपाईन्सच्या खेळाडूंचा उत्साहही दिसून आला. सहा मिनिटांनीच सोफिया हॅरिसनने गोल करण्याची संधी निर्माण केली, पण तिला यश आले नाही.

कोरिया रिपब्लिकनेही आक्रमक खेळ कायम राखत सामन्यावरील पकड सोडू दिली नाही. सोन येओनने १५व्या आणि १९व्या मिनीटाला फिलिपाईन्सच्या गोलजाळ्यावर आक्रमण केले, परंतु गोलकीपर मॅकडेनियलने अप्रतिम बचाव करत कोरिया रिपब्लिकला गोल करण्यापासून रोखले. फिलिपाईन्सनेही यानंतर जोरदार प्रत्युत्तर देताना कोरिया रिपब्लिकवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. कतरिना गिलोउने २४व्या मिनिटाला दूरुन मारलेल्या वेगवान किकवर चेंडू अवघ्या काही इंचने गोलजाळ्याच्या बाहेरुन गेल.

कोरिया रिपब्लिकने यानंतर आपला वेग अधिक वाढवला. ३४व्या मिनिटाला कोरिया रिपब्लिकने अखेर आपली आघाडी दुप्पट केलीच. चो ह्यो-जूच्या क्रॉसवर सोनने चेंडूचा अचूक अंदाज घेत शानदार गोल केला.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला फिलिपाईन्सचे मुख्य प्रशिक्षक  लेन स्टेजसीक यांनी मालीआ ल्युसी सीझर, चँडलर मॅकडेनियल आणि सारा कास्टानेडा यांना मैदानावर उतरवले. मात्र, याचा फारसा परिणाम जाणवला नाही. दुसऱ्या सत्रातही कोरिया रिपब्लिकची गोलकीपर किम जुंग-मी हिला क्वचितच आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. त्याचवेळी फिलिपाईन्सने भक्कम बचावाचे प्रदर्शन केल्याने कोरिया रिपब्लिकला तिसरा गोल करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली, पण त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. ६७व्या मिनिटाला गोल करण्याची मिळालेली  सुवर्ण संधी कोरिया रिपब्लिकच्या सोनला साधता आली नाही. यानंतर कोरिया रिपब्लिकने सातत्याने फिलिपाईन्सच्या गोलपोस्टवर आक्रमण केले, मात्र त्यांना यश आले नाही.

Tags: asian cup 2022korearepublic-lastwomens
ShareTweetSend
Next Post

माझी तुलना हार्दिक पंड्यासोबत? नक्की वाचा ;शार्दुल ठाकुरचे मत

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.