• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

कोहलीने १०० व्या कसोटी सामन्यात पूर्ण केल्या ८००० धावा;

by pravin
March 4, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

विराट कोहली आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील १०० वी कसोटी खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३८ धावा करत विराट कोहलीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कसोटी क्रिकेटमधील ८ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार धावा करणारा विराट कोहली भारताचा सहावा खेळाडू आहे. याआधी आधी सचिन तेंडुलकर, द वॉल राहुल द्रविड, लिटल मास्टर सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हा पराक्रम केला आहे.

 

कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार धाव करण्यासाठी १६९ डाव घेतले. हा टप्पा सचिन तेंडुलकरने १५४ डावांमध्ये गाठला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे तर, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८ हजार धावा करण्याचा विक्रम आहे. ८ हजार धावा करण्यासाठी त्याने १५२ डाव घेतले. राहुल द्रविडने १५८, वीरेंद्र सेहवागने १६० आणि सुनील गावस्करने १६६ डावात हा पराक्रम केला.

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या २५ सामन्यांमध्ये ४३ डाव खेळले आणि ४४.३५ च्या सरासरीने १७३० धावा केल्या. त्याच्या कारकिर्दीतील दुसऱ्या टप्प्यातील २५ सामन्यांमध्ये विराटने हे सिद्ध केले की, फलंदाजीसाठी तयार झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ४३ डावांत ५१.४५ च्या सरासरीने २१६१ धावा केल्या. यादरम्यान त्याने कसोटीत आठ शतके आणि चार अर्धशतके झळकावली. या दरम्यान कसोटी संघाची कमानही त्याच्या हाती आली होती. तेव्हापासून त्याच्या कसोटी कारकिर्दीचा सुवर्णकाळ सुरू झाला. आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या २५ सामन्यांमध्ये विराटची बॅट चांगलीच तळपली.

विराटच्या नेतृत्वाखालील संघाने परदेशात जाऊन सामने जिंकून अनेक विक्रम केले. विराटने ४२ डावांमध्ये ६७.१० च्या सरासरीने २६१७ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटने ११ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली. यादरम्यान त्याने ६४ टक्के अर्धशतकांचे शतकांमध्ये रूपांतर झाले. क्रिकेटवर राज्य केल्यानंतर विराट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. नोव्हेंबर २०१९ पासून त्याने एकही शतक झळकावलेले नाही. यादरम्यान त्याची सरासरीही घसरली असून भारतीय संघाचे तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदही त्याच्या हातून गेले आहे. विराटने आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या २४ सामन्यांमध्ये ४० डाव खेळले असून ३८.२६ च्या सरासरीने १४५४ धावा केल्या आहेत. यावेळी केवळ दोनच शतके झळकली आहेत. त्याचबरोबर त्याने नऊ वेळा अर्धशतकी खेळी खेळली आहे.

Tags: CricketRunVirat Kohli
ShareTweetSend
Next Post

दुःखद ; प्रतिष्ठित क्रिकेटपटू शेन वॉर्नचे निधन;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.