• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खेलो इंडिया यूथ गेम्स2021:आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महिला गटात सिद्धी हत्तेकरचे रौप्यपदक

by pravin
June 8, 2022
in खेलो इंडिया यूथ गेम्स, जिम्नॅस्टिक
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पंचकुला(प्रतिनिधी): खेलो इंडिया यूथ गेम्स आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महिला गटात सिद्धी हत्तेकरने आजच्या दुसऱ्या दिवशी टेबल व्हाॅल्ट या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक जिंकत महाराष्ट्राच्या पदक तालिकेत आणखीन एका पथकाची भर घातली.

कालच्या “वैयक्तिक सर्वोत्कृष्ट जिम्नास्ट” या स्पर्धा प्रकारात रिद्धी हत्तेकरने कास्य पदक मिळवले होते. तर पुरुष गटात मनेश गाढवे ने कास्य पदक मिळवत पुरुषांमध्येही पथकाचे खाते उघडले. मागील तीनही खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये रिद्धी आणि सिद्धी भगिनींनी पथकांची मालिका निर्माण केली व ती याही स्पर्धेमध्ये त्यांनी ही मालिका सातत्य राखत भविष्यातील भारतीय संघाच्या संभाव्य खेळाडूंमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी एक पाऊल आणखीन पुढे टाकले. औरंगाबाद येथील एन सी ओ इ साई पश्चिम विभागीय केंद्रात या दोन्ही भगिनी  रामकृष्ण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात त्यांना पिंकी देवनाथ व संजय मोरे यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. रिद्धी हत्तेकरने , तिला झालेल्या पाठीच्या दुखापतीतून स्वतःला सावरत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि वैयक्तिक सर्वोत्कृष्ट जिम्नास्ट स्पर्धेत कास्य पदक जिंकले. तर सिद्धी हट्टेकरने टेबल व्हाॅल्ट या प्रकारात आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत रौप्यपदक जिंकले. याच प्रकारात महाराष्ट्राच्या रिया केळकर हिने पाचवे स्थान प्राप्त केले. तिला आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक सविता मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्राच्या या खेळाडूंच्या यशाबद्दल महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष  संजय शेटे सचिव डॉक्टर मकरंद जोशी आणि सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

 

Tags: khelo india youth games 2022khelo india youth games 2022 Marathi Newskhelo india youth games 2022 NewsLatest sports news
ShareTweetSend
Next Post

खेलो इंडिया युथ गेम्स 2021; महाराष्ट्राची आगेकूच योगा आणि सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.