• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हॉकी: जुगराज सिंगच्या हॅट्ट्रिकमुळे महाराष्ट्राचा दिल्लीवर दिमाखदार विजय

by pravin
November 2, 2023
in नॅशनल गेम्स, हॉकी
Reading Time: 1 min read
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हॉकी: जुगराज सिंगच्या हॅट्ट्रिकमुळे महाराष्ट्राचा दिल्लीवर दिमाखदार विजय

महाराष्ट्रा (ऑरेंज जर्सी) विरुद्ध दिल्ली ४-२

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मापुसा (प्रतिनिधी):  जुगराज सिंगच्या हॅट्ट्रिकमुळे महाराष्ट्राच्या पुरुष हॉकी संघाने दिल्लीवर ४-२ असा दिमाखदार विजय मिळवला. ब-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.
मापुसा येथील पेड्डेम क्रीडा संकुलात चालू असलेल्या हॉकी क्रीडा प्रकाराच्या साखळी सामन्यात सहाव्या मिनिटाला अजिंक्य जाधवने मैदानी गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले.

त्यामुळे पहिल्या सत्रात महाराष्ट्राकडे १-० अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात २१व्या मिनिटाला गोविंद बिश्तने मैदानी गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. परंतु पाचच मिनिटांनी जुगराजने (२६व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केला. त्यामुळे मध्यंतराला महाराष्ट्राकडे २-१ अशी आघाडी होती. तिसऱ्या सत्रात ३७व्या मिनिटाला जुगराजने पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने दुसरा गोल नोंदवत महाराष्ट्राची आघाडी ३-१ अशी वाढवली.

पुढच्याच मिनिटाला दिल्लीच्या धीरज वत्सने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत हा फरक ३-२ असा कमी केला. मग चौथ्या सत्रात जुगराजने ५७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे तिसरा वैयक्तिक गोल साकारला.
आंतरराष्ट्रीय हॉकीपटू युवराज वाल्मिकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या पुरुष हॉकी संघाने सोमवारी ओडिशाचा २-१ असा पराभव करून राष्ट्रीय स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली होती.

Tags: 37th National Games Goa37th National Games Goa Hockey news37th National Games Goa news
ShareTweetSend
Next Post
डायव्हिंगमध्ये ईशाला सुवर्ण तर ऋतिकाला रौप्य महिलांच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक

डायव्हिंगमध्ये ईशाला सुवर्ण तर ऋतिकाला रौप्य महिलांच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.