• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL2022: RR vs LSG चुरशीच्या लढतीत राजस्थानचा ३ धावांनी विजय

by pravin
April 11, 2022
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई | शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या आयपीएल २०२२मधील सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ३ धावांनी पराभव केला. नाणेफक गमावलेल्या संजू सॅमसनच्या राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. स्फोटक खेळाडू शिमरॉ़न हेटमायरने नाबाद ५९ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात लखनऊची आघाडीची आणि मधली फळी ढेपाळली. शेवटच्या काही षटकात मार्कस स्टॉइनिसने आकर्षक फटकेबाजी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले.

लखनऊची झुंज अपयशी

राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर कप्तान केएल राहुलचा त्रिफळा उडवत लखनऊला चांगली सुरुवात करू दिली नाही. दुसऱ्याच चेंडूवर बोल्टने कृष्णप्पा गौतमला पायचीत पकडले. त्यानंतर प्रसिध कृष्णाने जेसन होल्डरला झेलबाद केले. २५ धावांची खेळी केलेला दीपक हुडा कुलदीप सेनचा बळी ठरला. ७४ धावांत लखनऊने आपले पाच फलंदाज गमावले. यानंतरही लखनऊचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. आजच लखनऊसाठी पहिला सामना खेळणाऱ्या मार्क स्टॉइनिसने फटकेबाजी करत सामन्याला शेवटच्या षटकापर्यंत नेले. ६ चेंड़ूत १५ धावांची गरज असताना स्टॉइनिस युवा गोलंदाज कुलदीप सेनला मोठे फटके खेळण्यात अपयशी ठरला. या षटकात लखनऊला ११ धावा घेता आल्या. स्टॉइनिसने २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ३८ धावांची खेळी केली. २० षटकात लखनऊला ८ बाद १६२ धावा करता आल्या. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने ४१ धावांत ४ बळी घेतले.

राजस्थानचा डाव

यंदा भन्नाट फॉर्मात खेळणाऱ्या जोस बटलरला आज लखनऊविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही. वेगवान गोलंदाज आवेश खानने बटलरचा (१३) सुंदर त्रिफळा उडवला. दहाव्या षटकात कृष्णप्पा गौतमने संयमी खेळणारा देवदत्त पडिक्कल (२९) आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन (४) यांना बाद केले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि रवीचंद्रन अश्विनने फटकेबाजी केली. हेटमायरने अर्धशतक ठोकत संघाला दीडशेपार पोहोचवले. हेटमायरने १ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. २० षटकात राजस्थानने ६ बाद १६५ धावा केल्या. लखनऊकडून जेसन होल्डर आणि कृष्णप्पा गौतम यांनी २-२ बळी घेतले.

WHAT. A. GAME! 👌 👌@rajasthanroyals return to winning ways after edging out #LSG by 3 runs in a last-over finish. 👏 👏

Scorecard 👉 https://t.co/8itDSZ2mu7#TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/HzfwnDevS9

— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022

Tags: IPL Indian premier leagueipl2022IPL2022: RR vs LSG Rajasthan beat Churshi by 3 runsKKRvDCRajasthan RoyalsTATAIPL
ShareTweetSend
Next Post

'महाराष्ट्र केसरी' जिंकणाऱ्या पृथ्वीराज पाटीलबाबत जे घडलंय ते आख्ख्या राज्यासाठी लज्जास्पद!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.