• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL 2022: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांची संभावित प्लेइंग इलेव्हन्स संघ

by pravin
March 27, 2022
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आयपीएल २०२२ ची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) झाली. त्यानंतर रविवारी (२७ मार्च) या हंगामातील पहिला डबल हेडर खेळला जाईल. रविवारी दुपारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात, तर सायंकाळी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा सामना पार पडेल. पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन मागच्या हंगामात काही खास राहिले नव्हते. मागच्या हंगामात मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नव्हता. आगामी हंगामात मात्र संघ चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल. तसेच दिल्ली कॅपिटल्सही प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्याच्या प्रयत्नात असेल.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा विचार केला, तर यामध्ये सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन खेळपट्टीवर येतील. जार हे दोन्ही सलामीवीर फॉर्ममध्ये असले, तर जगातील कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाची धुलाई करू शकतात. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना या दोघांपासून सावध राहावे लागणार आहे. मुंबईचा महत्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात उपस्थित नसेल. तो नुकताच एनसीएमधून रिहॅबिलिटेशननंतर संघामध्ये दाखल आहे. त्याच्या जागी फॅबियन ऍलनला संघात घेतले गेले आहे.

मुंबई इंडियन्साचा मध्यक्रम आणि खालच्या फळीवर खास लक्ष द्यावे लागेल, ज्यामध्ये फक्त कायरन पोलार्ड अनुभवी खेळाडूच्या रूपात उपस्थित आहे. या विभागात तिलक वर्मा, टिम डेविड आणि दक्षिण अफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस यांच्यापैकी कोणताला संधी मिळेल हे पाहावे लागेल. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळेल, तसेच जयदेव उनादकडही ब्रेबॉर्न स्टेडियमच्या खेळपट्टीवर प्रभावी गोलंदाजी करू शकतो. मुंबईकडे मयंक मार्कंडे आणि मुरुगन अश्विनच्या रूपात प्रभावी फिरकी गोलंदाजही आहेत.

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) रिषभ पंत (Rishabh Pant) आणि पृथ्वी शॉ डावाची सुरुवात करू शकतात. ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर अद्याप संघासोबत सहभागी झालेला नसल्यामुळे ही जोडी सलामीसाठी मैदानात दिसण्याची शक्यता आहे. रिषभ पंतला चांगले प्रदर्शन करून इतरांसाठी आदर्श ठेवावा लागेल.

वेस्ट इंडीजचा फलंदाज रोवमन पॉवेल, सरफराज खान आणि १९ वर्षाखालील विश्वचषक विजता कर्णधार यश धूल यांच्यावर मध्यक्रमात चांगले प्रदर्शन करण्याची जबाबदारी असेल. अष्टपैलू शार्दुल ठाकुर आणि अक्षर पटेल फिनिशरच्या भूमिकेत असतील.

अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यावर फिरकी गोलंदाजीची विभाग सांभाळण्याची जबाबदारी असेल. वेगवान गोलंदाजी आक्रमणाची कमान दक्षिण अफ्रिकेच्या एन्रिच नॉर्किया याच्या हातत असेल आणि मुस्तफिजूर रहमान त्याची साथ देईल. त्याव्यतिरिक्त युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीलाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

संभावित प्लेइंग इलेव्हन्स –
मुंबई इंडियन्स –
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, डॅनियन सॅम्स/डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, कायरन पोलार्ड, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे.

दिल्ली कॅपिटल्स –
पृथ्वी शॉ, टिम सिफर्ट, यश धूल, मंदीप सिंग, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, चेतन साकरिया

Tags: Delhi Capitalsipl 2022MUMBAI INDIANSProbable playing XI between
ShareTweetSend
Next Post

IPL 2022; तिसरा सामना पंजाब VS बेंगलोर दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.