• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 17, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL 2022मुंबईच्या खेळाडूची KKRच्या कॅप्टनपदी निवड;

by pravin
February 16, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई – कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी कर्णधारपदाची घोषणा केली आहे. फ्रेंचायझीने २७ वर्षीय श्रेयस अय्यरची संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड केली आहे. तो कोलकाताचा एकूण सहावा कर्णधार असेल. यापूर्वी सौरव गांगुली, ब्रेंडन मॅक्क्युलम, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक आणि इऑन मॉर्गन यांनी केकेआरचे नेतृत्व केले आहे. कोलकाता संघ दोन वेळा चॅम्पियन आहे. २०१२ मध्ये कोलकाताने चेन्नईचा तर २०१४ मध्ये पंजाबला फायनलमध्ये पराभूत केले होते.

 

श्रेयस अय्यरला यंदा कोलकाता संघाने १२.२५ कोटी रुपयांना संघात दाखल केले आहे. अय्यर प्रथमच कोलकात्याकडून खेळणार आहे. तो एक विश्वासार्ह फलंदाज आहे आणि गरज पडेल तेव्हा तो स्फोटक फलंदाजीही करू शकतो. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

 

२०१९ मध्ये, अंतिम चारमध्ये पोहोचल्या दिल्ली संघाने आणि २०२० मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मुंबईने विजेतेपदाच्या लढतीत दिल्लीचा पराभव केला. अशा स्थितीत अय्यरच्या कर्णधारपदावर कोलकाताचा पूर्ण विश्वास असेल. याच कारणामुळे कोलकाताने त्याला एवढी मोठी किंमत देऊन आपल्या संघात समाविष्ट केले आहे. ८७ आयपीएल सामन्यांमध्ये अय्यरने ३१.६७च्या सरासरीने २३७५ धावा केल्या आहेत. आयपीएलमधील अय्यरची सर्वात मोठी खेळी ९६ धावांची होती.

कोलकाता नाइट रायडर्स संघ-

 

व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्ज, अनुकुल रॉय, रसिक सलाम, अभिजित तोमर, प्रथम सिंह, अमन खान, रमेश कुमार, अशोक शर्मा, टिम साऊदी, अॅलेक्स हेल्स, मोहम्मद नबी, उमेश यादव, बी इंद्रजीत, चमिका करुणारत्ने.

Tags: Cricketipl 2022MumbaiPLAYERS
ShareTweetSend
Next Post

विराटबाबत मत देताना रोहित शर्मा भडकला!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.