• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL 2022 : महाराष्ट्रात रंगणार स्पर्धा..! नक्की वाचा ;

by pravin
January 31, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

क्रिकेटरसिकांना आता भारतातील आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनचे वेध लागले आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असणारी ही स्पर्धा यंदा कुठे होणार, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. आयपीएल २०२२ मधील लीग टप्पा महाराष्ट्रात आयोजित केला जाऊ शकतो. त्याचवेळी अहमदाबादमध्ये प्लेऑफचे सामने होऊ शकतात. यावेळी आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होत असून ७४ सामने खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयला तीन स्टेडियम उपलब्ध असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

साखळी टप्प्यातील सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जातील. गरज भासल्यास पुण्यात आयपीएलचे सामने आयोजित केले जातील.  सध्या मंडळ महाराष्ट्रात लीग स्टेज आणि अहमदाबादमध्ये प्लेऑफ आयोजित करण्याचा विचार करत आहे. अहवालात असेही म्हटले आहे, की बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (२७ जानेवारी) भेट घेतली आणि देशातील कोविडची परिस्थिती बिघडली नाही, तर ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाईल असे स्पष्ट केले. परिस्थिती बिघडल्यास ते यूएईला जातील.

अहवालात असेही म्हटले आहे, की कोविड परिस्थिती नियंत्रणात राहिली तर स्टेडियममध्ये किमान २५ टक्के क्षमतेच्या प्रेक्षकसंख्येला परवानगी देण्याची योजना आहे. यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे.

१२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएलचा मेगा लिलाव बंगळुरू येथे होणार आहे. यावेळी १२००हून अधिक खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

Tags: Cricketipl 2022leagues matchmaharashtra
ShareTweetSend
Next Post

नदालचा ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा; मेदवेदेववर पाच सेटमध्ये मात

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.