• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय मास्टर शंतनु भांबुरेला पहिल्या शरद पवार अखिल भारतीय फिडे जलद रेटिंग खुल्या स्पर्धेचे जेतेपद

by pravin
January 9, 2023
in बुद्धिबळ, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
आंतरराष्ट्रीय मास्टर शंतनु भांबुरेला पहिल्या शरद पवार अखिल भारतीय फिडे जलद रेटिंग खुल्या स्पर्धेचे जेतेपद
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई : नुकताच आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पटकावणाऱ्या २६ वर्षीय शंतनू भांबुरेने (एलो रेटिंग २१८६) साडेआठ गुण मिळवून गरवारे क्लब हाऊसतर्फे वानखेडे स्टेडियम येथे आयोजित केलेल्या पहिल्या शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. नऊ डावांच्या या स्पर्धेत शंतनूने आठ विजय मिळवले, तर एक डाव बरोबरीत सोडवला.

चार बुद्धिबळपटूंनी प्रत्येकी आठ गुणांची कमाई केल्यामुळे स्पर्धेचे दोन ते पाच क्रमांकाचे विजेते हे टाय बे्रकरनुसार निश्चित करण्यात आले. यापैकी दुसरा क्रमांक आकाश दळवीने (एलो रेटिंग २१५४), तिसरा क्रमांक शैलेश बारियाने (एलो रेटिंग १७८०) आणि चौथा कँडिडेटस मास्टर वेदांत पिंपळखरेने (एलो रेटिंग २१८२) यांनी मिळवले. या स्पर्धेत पाचवा क्रमांक हा २१ वर्षीय युवा बुद्धिबळपटू अंकुर गोखलेने (एलो रेटिंग १७९९) पटकावला. याचप्रमाणे साडेसात गुण मिळवणारा देव शाह सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला.

१५ वर्षांखालील वयोगटात मुलांमध्ये श्रेयांस सोमय्या, सुयोग वडके आणि आराव अय्यर यांनी प्रत्येकी सहा गुणांसह अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये सारा मोदी आणि श्रीया जोशी यांनी प्रत्येकी पाच गुणांसह अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला. हर्षिता महेश्वरीला साडेचार गुणांसह तिसरा क्रमांक मिळाला.

आंतरराष्ट्रीय मास्टर शंतनु भांबुरेला पहिल्या शरद पवार अखिल भारतीय फिडे जलद रेटिंग खुल्या स्पर्धेचे जेतेपद

गरवारे क्लब हाऊसच्या सदस्यांपैकी निवान शाह आणि देविका पिंगे यांनी अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटाचे पारितोषिक पटकावले. ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठीच्या वयोगटात वासावे गोवर्धन आणि लहूचंद ठाकूर यांनी प्रत्येकी सहा गुणांसह पहिले दोन क्रमांक मिळवले. अपंगांसाठीच्या गटात यश गोगटे पहिला आला, तर स्वप्नील हुळेला दुसरा क्रमांक मिळाला.

स्पर्धेतील विजेत्यांना माजी आमदार आणि गरवारे क्लब हाऊसचे उपाध्यक्ष राज पुरोहित, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि गरवारे क्लब हाऊसचे कोषाध्यक्ष मनीष अजमेरा यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

 वयोगटांचे निकाल
१३वर्षांखालील मुले : १ दक्ष जैन, २ व्हिवान सरडाना, ३ आदित्य भोसले.
१३वर्षांखालील मुली : १ साची कुलकर्णी, २ मुस्कान मिस्त्री, ३ मयांका राणा.
११वर्षांखालील मुले : १ श्रियांस आगरकर, २ जियान शाह, ३ हृदय मणियार.
११वर्षांखालील मुली : १ खनक पहारिया, २ हिया पाटील, ३ आकृती सिंग.
९ वर्षांखालील मुले : १ अर्जुन सिंग, २ मेधांश पुजारी, ३ संजय डोबल.
९ वर्षांखालील मुली : १ कृषा जैन, २ अमया रॉय, ३ पेहल पहारिया.
७ वर्षांखालील मुले : १ रियांश बोराटे, २ नोव्हा जुयाल, ३ व्हिवियान गोयल.
७ वर्षांखालील मुले : १ नित्या बंग, २ ओवी हिवसे, ३ अनिष्का बियानी.

आंतरराष्ट्रीय मास्टर शंतनु भांबुरेला पहिल्या शरद पवार अखिल भारतीय फिडे जलद रेटिंग खुल्या स्पर्धेचे जेतेपद

Tags: 26-year-old Shantanu Bhambure (Ello Rating 2186) who won the International Master's title scored eight and a half points.first Sharad Pawar All India FIDE Rapid Rating Open Tournament titleFormer MLA and Garware Club House Vice President Raj PurohitInternational Master Shantanu Bhamburela winsMaharashtra Chess Association Secretary Niranjan Godbole and Garware Club House Treasurer Manish Ajmera
ShareTweetSend
Next Post
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धा 2022- 23: जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंचे वर्चस्व

महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धा 2022- 23: जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंचे वर्चस्व

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.