• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सुझुकी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसाठी भारताचा संघ जपानला रवाना.

by pravin
April 25, 2023
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, जिम्नॅस्टिक
Reading Time: 1 min read
सुझुकी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसाठी भारताचा संघ जपानला रवाना.
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी ): २१ ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान ओटो-सिटी,टोकियो, जपान येथे सुझुकी एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनल दी जिम्नॅस्टिक्स FIG, तसेच इंटरनॅशनल एरोबिक्स फेडरेशन, जपान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या स्पर्धेकरिता भारतातून मीत कोसंबीया – वरिष्ठ गट पुरुष एकेरी (गुजरात), अंजोरी पानगंबम कनिष्ठ गट महिला एकेरी व ,अरीहा पानगंबम – वरिष्ठ गट महिला एकेरी ( दोन्ही मणिपूर) या ३ खेळाडूंची निवड झाली आहे. या संघा बरोबर प्रशिक्षक म्हणून युमनाम रंजनसिंग – (मणिपूर),सागर बिडीवाला – (गुजरात) यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच या संघा बरोबर संघप्रमुख व पंच म्हणून डॉ.मकरंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. या संघाची घोषणा मार्च मध्ये बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे या संघास मारुती सुझुकी इंडिया व हाकूहोडो सीन्क प्रा.लि., दिल्ली यांनी पुरस्कृत केले आहे एरोबिक जिम्नॅस्टिक्स भारतीय संघाला पहिल्यांदाच अशा पद्धतीने संपूर्णपणे स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आले आहे.

या स्पर्धेकरिता जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर मित्तल, कोषाध्यक्ष कौशिक बिडीवाला, मारुती सुझुकी चे साईटो सॅन, नायोटो ताकाहाशी, विशाल शर्मा, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी ,उपसंचालक भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग नितीन जैस्वाल, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचलनालय छत्रपती संभाजीनगर विभाग सुहास पाटील, मसांमचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ.सागर कुलकर्णी,डॉ.विशाल देशपांडे, अमेय जोशी, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, रोहीत रोंघे, भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे, टीएसो सौ. तनुजा गाढवे यांनी सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: Indian teamJapanNEWSSuzuki World Cup 2023.
ShareTweetSend
Next Post
कोहली डुप्लेसी चमकले;बैंगलोर ने 24 धावांनी पंजाबचा पराभव केला.

कोहली डुप्लेसी चमकले;बैंगलोर ने 24 धावांनी पंजाबचा पराभव केला.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.