• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भारतीय एरोबिक जिम्नॅस्टिक संघाच्या प्रशिक्षण शिबिराची सांगता 13 तारखेला दिल्लीमार्गे पोर्तुगालला रवाना होणार

by pravin
June 12, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, जिम्नॅस्टिक
Reading Time: 1 min read
भारतीय एरोबिक जिम्नॅस्टिक संघाच्या प्रशिक्षण शिबिराची सांगता 13 तारखेला दिल्लीमार्गे पोर्तुगालला रवाना होणार

गुइमारेस पोर्तुगाल येथे आयोजित 21 व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय एरोबिक जिम्नॅस्टिक संघ. सुनील छत्री प्रशिक्षक, डॉ. मकरंद जोशी

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद(प्रतिनिधी): गुमरेज, पोर्तुगाल येथे दि. 14 ते 19जून 2022 दरम्यान होत असलेल्या 17 व्या जागतिक एरोबिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सराव शिबिर औरंगाबाद येथील पश्चिम विभागीय साई प्रशिक्षण केंद्रात दिनांक 1 जून 2022 ते 11 जून 2022 दरम्यान संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिरात 17 खेळाडू सहभागी झाले होते. या प्रशिक्षण शिवराची (दि.११) शनिवार रोजी साई पश्चिम विभागीय केंद्र औरंगाबाद येथे सांगता झाली.

सेनादलाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुनील छत्री महाराष्ट्राचे हर्षल मोगरे व एशियन जिम्नॅस्टिक्स युनियन चे तांत्रिक समिती सदस्य डॉक्टर मकरंद जोशी आणि सिद्धार्थ कदम यांनी या शिबिरात खेळाडूंना मार्गदर्शन केले. अतिशय कसून सराव खेळाडूंकडून या शिबिरात करून घेण्यात आला व खेळाडूंच्या सफाईदार कामगिरीवर जास्त भर देण्यात आला. भारतीय संघातील खेळाडू निश्चितच अंतिम फेरीपर्यंत पोहोचतील अशी आशा प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे. भारतीय संघ 13 जून सोमवार रोजी सायंकाळी दिल्लीमार्गे पोर्तुगालला रवाना होणार आहे.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे

पुरुष एकेरी जॉनी कुमार ( सेनादल) महिला एकेरी अरीहा पंगंबम (मणिपूर) मिश्र दुहेरी ऋग्वेद जोशी – साक्षी लड्डा (महाराष्ट्र) मिश्र दुहेरी -2 प्रकृती शिंदे – निशांत चौहान (गुजरात) तिहेरी जॉनी कुमार, मोहम्मद नयमुद्दीन, संदीप रमोला (सेनादल) समूह धैर्यशील देशमुख, संदेश चींतलवाड, गौरव जोगदंड, अभय उंटवाल, ऋग्वेद जोशी (महाराष्ट्र) एरोडान्स :- साक्षी लड्डा, सिल्वी शहा, साक्षी डोंगरे, विजय इंगळे, धैर्यशील देशमुख, संदेश चींतलवाड, गौरव जोगदंड, अभय उंटवाल (महाराष्ट्र) प्रशिक्षक:- सुनील छत्री (सेनादल) हर्षल मोगरे (महाराष्ट्र)  पंच:- यूमनाम रंजन (मणिपूर) व्यवस्थापक:-टी.पी. किरण (कर्नाटक) संघ प्रमुख:- दिलीप सर्वैया (गुजरात)

या संघाला भारतीय जिम्नॅस्टिक्स महासंघाचे अध्यक्ष सुधीर मित्तल, कोषाध्यक्ष  कौशिक बीडवाला, तांत्रिक समिती अध्यक्ष  एस पी सिंग महाराष्ट्र जिमनॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष  संजय शेटे सचिव डॉ. मकरंद जोशी औरंगाबाद जिल्हा जिम्नास्टिक्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. आदित्य जोशी, संकर्षण जोशी, सागर कुलकर्णी, तनुजा गाढवे, साई पश्चिम विभागीय केंद्राचे संचालक सुस्मिता जुत्शी, उपसंचालक श्रीनिवास मालेकर, प्रशिक्षक संजय मोरे, पिंकी देवनाथ, औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील,  जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: 17th World Aerobic Gymnastics ChampionshipsDr. Makarand Joshi.Federation of Indian Gymnastics President Sudhir MittalIndian aerobic teamSunil ChhetriTechnical Committee Chairman SP SinghTreasurer Kaushik Beedwala
ShareTweetSend
Next Post
आयटीएफ एस100 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नीरज आनंद, रामराव डोसा यांना दुहेरी मुकुट

आयटीएफ एस100 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नीरज आनंद, रामराव डोसा यांना दुहेरी मुकुट

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.