• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 18, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या पदक मोहिमेत जलतरणपटू आणि तायक्वांदोपटूंची छाप!

by pravin
November 1, 2023
in अन्य खेळ, जलतरण, तायक्वांदो, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
महाराष्ट्राच्या पदक मोहिमेत जलतरणपटू आणि तायक्वांदोपटूंची छाप!
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पणजी (प्रतिनिधी): महाराष्ट्राचा ऑलिम्पिकपटू वीरधवल खाडे व त्याची पत्नी ऋजुता यांनी येथे अनुक्रमे पुरुष व महिला गटात वेगवान जलतरणपटूचा मान मिळवताना मुलखावेगळी कामगिरी केली. मिहीर आंम्ब्रेने ५० मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत कांस्यपदक जिंकताना आणखी एक पदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या पलक जोशीने आजारपणावर मात करीत २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक जिंकले तर ऋषभ दासने या शर्यतीत रौप्य पदक मिळवले. याचप्रमाणे तुषार गीतेने प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्राने मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील जलतरणात तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन रौप्य अशी एकूण सहा पदकांची कमाई केली.

वीरधवलने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत २२.८२ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले. त्याने २०१५ मध्ये स्वतःच नोंदवलेला २३ सेकंद हा स्पर्धा विक्रम येथे मोडला. त्याचा सहकारी मिहीरने याच शर्यतीत ब्रास पदक मिळवताना २२.९९ सेकंद अशी वेळ नोंदविली.
वीरधवलच्या शर्यती पाठोपाठ त्याची पत्नी ऋजुताने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत २२.४२ सेकंदांत पार केली आणि वेगवान जलतरणपटू हा किताब मिळवला. ही स्पर्धा जिंकताना तिने अवंतिका चव्हाणने राजकोट येथे गतवर्षी नोंदविलेला २६.५३ सेकंद हा स्पर्धा विक्रम मोडला.
२०० मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत ऋषभ दास याने रौप्य पदक जिंकले. त्याने हे अंतर दोन मिनिटे ४.८० सेकंदात पार केले.

आजारपणावर मात करीत पलकची सोनेरी कामगिरी
महाराष्ट्राच्याच पलक जोशीने मिळवलेले यश अतिशय कौतुकास्पद आहे‌. तिने २०० मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यत दोन मिनिटे २२.१२ सेकंदात पार करून सुवर्णपदक जिंकले. आज तिने प्राथमिक फेरीतून आठव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र जिद्दीच्या जोरावर तिने शेवटच्या १०० मीटर्समध्ये आघाडी घेत सोनेरी यश खेचून आणले. दोन दिवसांपूर्वी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार करावे लागले होते. आज सकाळी तिने पात्रता फेरीत भाग घेतला आणि आठवा क्रमांकासह अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले.

प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये तुषार गितेला कांस्यपदक
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तुषार गीतेने प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये कांस्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शानदार सलामी दिली. या स्पर्धेमध्ये त्याचे हे पहिलेच पदक आहे. त्याने २४९.९० गुण नोंदवले. तो मुंबई येथील खेळाडू असून रेल्वे संघाकडून त्याने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

वॉटरपोलोच्या दोन्ही गटांत महाराष्ट्राचे धडाकेबाज विजय
महाराष्ट्राच्या संघांनी वॉटरपोलोमध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटांत एकतर्फी विजय नोंदवत आगेकूच कायम राखली. पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने मणिपूरचा २८-३ असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राचा हा पहिला सामना होता. महिलांच्या गटात महाराष्ट्राने आसाम संघाचा २५-१ असा दारुण पराभव केला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय आहे. काल त्यांनी मणिपूर संघाची धूळधाण उडवली होती.

तायक्वांदो
महाराष्ट्राला दोन सुवर्णपदकांसह चार पदके
क्रीडा प्रतिनिधी, पणजी
महाराष्ट्र संघाची युवा खेळाडू मृणाली हर्नेकर आणि अभिजीत खोपडेने मंगळवारी तायक्वांदोमध्ये सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.
महिलांच्या वैयक्तिक पुमसाई गटात मृणालीने सर्वाधिक ६.८१ गुणांसह अव्वल स्थानी धडक मारली. तिने या गटात केरळच्या लाया फातिमा सीके हिला मागे टाकले. साक्षी पाटीलने ४६ किलोखालील गटात रौप्यपदकाची कमाई केली.
५४ किलोखालील गटात अभिजीतने सोनेरी यश मिळवले. आसामच्या निर्मल कश्यपला रौप्यपदक मिळाले. तसेच वंशप्रेम ठाकूरने पुरुषांच्या पुमसाईमध्ये गटात कांस्यपदक पटकावले.
सुवर्ण : मृणाली हर्नेकर
सुवर्ण : अभिजीत खोपडे
रौप्य : साक्षी पाटील
कांस्य : वंशप्रेम ठाकूर

Tags: 37th National Games Goa37th National Games Goa Taekwondo NewsEarned six medals in swimming and four in taekwondowimmers and taekwondo players in Maharashtra's medal campaign!
ShareTweetSend
Next Post
दत्तू भोकनळला रौप्यपदक एकूण चार पदकांची कमाई

नौकानयनत दत्तू भोकनळला रौप्यपदक एकूण चार पदकांची कमाई

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.