• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

विनोद कांबळीने निवडले फॅब फोर; विराट वगळता सर्वच नावे चकित करणारी

by pravin
December 21, 2021
in क्रिकेट, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आजकाल असे दिसते की क्रिकेटजगतात फॅब फोर निवडण्याचा ट्रेंड आहे, प्रत्येकजण आपला फॅब फोर निवडत आहे. फॅब फोरमध्ये विराट कोहलीसोबत स्टीव्ह स्मिथ , केन विलियम्सन जो रूट आणि बाबर आझम यांची नावे सामायिक आहेत. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी  याच्या यादीत असे नाही. कांबळीच्या फॅब फोरच्या यादीत विराट कोहली आहे. मात्र, बाकीची नावे गायब आहेत. आता प्रश्न असा आहे की, कांबळीने आपले फॅब फोर म्हणून आणखी कोणाची निवड केली आहे?

सचिन तेंडुलकरच्या अधिकृत ऍपवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कांबळीने फॅब फोर संदर्भात आपले उत्तर दिले आहे. एका ऍपने ट्विट केले आणि विचारले की, क्रिकेटमधील तुमचे फॅब फोर कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर अनेक क्रिकेट चाहत्यांनी दिले. पण विनोद कांबळीने दिलेले उत्तर वेगळेच आहे.

भारताचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळी याने विराट कोहलीचा  क्रिकेटच्या फॅब फोरमध्ये समावेश केला आहे. मात्र स्मिथ, विलियम्सन, बाबर व रूट या सर्व फलंदाजांना त्याच्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. विराट व्यतिरिक्त कांबळीने आपल्या फॅब फोरमध्ये सुनील गावसकर , विव्ह रिचर्ड्स  आणि सचिन तेंडुलकर यांना जागा दिली आहे.

कांबळीचा फॅब फोर पाहता, सध्याच्या फलंदाजांमध्ये न राहता त्याने आपले ऑल टाईम फॅब फोर निवडले आहेत, असे दिसते. त्याने आपल्या फॅब फोरमध्ये ७०-८० च्या दशकातील दोन फलंदाजांना ठेवले. ९० च्या दशकातील सचिन तेंडुलकरची निवड केली. तर, सध्याच्या काळातील विराट कोहलीला स्थान देण्यात आले आहे. त्याच्या फॅब फोरमध्ये तीन भारतीय आहेत हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.

विनोद कांबळीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची जोरदार सुरुवात झाली होती. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटीत त्याने द्विशतक झळकावले. यानंतर पुढच्या कसोटीत त्याने झिम्बाब्वेविरुद्ध २२७ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या पुढील कसोटी मालिकेत त्याने दोन शतके झळकावली. वाढदिवसाच्या दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना शतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटर आहे. मात्र, कामगिरीत सातत्य न राखता आल्यामुळे त्याची कारकीर्द लवकर संपुष्टात आली.

Tags: sachin tendulkarSunil GavaskarVinod KambliVirat KohliViv Richards
ShareTweetSend
Next Post

वडिल नाही बनू शकले क्रिकेटर, म्हणून उघडले किराणा दुकान; आता मुलाची थेट ‘टीम इंडिया’त निवड

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.