• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ग्रामीण पाेलीस, शहर पाेलीस संघ भगतसिंग चषकासाठी भिडणार

by pravin
April 1, 2022
in क्रिकेट, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद(प्रतिनिधी): गरवारे क्रिकेट संकुलावर सुरू असलेल्या कास्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित ३० व्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत ग्रामीण पोलीस व शहर पोलीस संघ विजेतेपदासाठी झूंजणार आहेत. रविवार ३ एप्रिल रोजी हा अंतिम सामना होईल. पहिल्या उपांत्य सामन्यात शहर पोलीस संघाने एनआरबी संघावर ६ गडी राखून विजयी मिळवला. दुसऱ्या सामन्यात ग्रामीण पोलीस संघाने मसीआ ‘ब’ संघावर ४९ धावांनी विजय संपादन केला. अाजचा सामन्यात राजू परचाके व विकास नगरकर सामनावीर ठरले.

नाणेफेक जिंकून एनआरबी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सर्वबाद १३३ धावा केल्या. यामध्ये विनोद लंबेने ४९ चेंडूत १ षटकार व ७ चौकारांसह ५८ धावा काढल्या. सचिन शेंडगेने १९ चेंडूत ४ चौकारांसह २३ धावा, शुभम हरकलने १९ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २२ धावा तर रुद्राक्ष बोडकेने ८ चेंडूत ३ चौकारांसह १५ धावांचे योगदान दिले. शहर पोलीसकडून राजू परचाकेने केवळ ३२ धावात ४ महत्त्वपूर्ण गडी त्रिफळाचीत केले. शेख जिलानीने १७ धावात २ गडी इशांत राय व राहुल जोनवाल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलीस संघाने विजयी लक्ष केवळ १५ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. आर्यन शेजुळने अप्रतिम फलंदाजी करताना केवळ ३९ चेंडूत ३ उत्तुंग षटकार व ६ चौकारांसह ६३ धावा, रिजवान अहेमदने २४ चेंडूत ४ चौकारांसह २७ धावा तर राहुल जोनवालने १३ चेंडूत १ चौकारासह १५ धावांचे योगदान दिले. एनआरबी संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार प्रशांत काकडेने २८ धावात २ गडी तर व्यंकटेश  सोनवलकरने १ गडी बाद केला.

विकास नगरकरची अष्टपैलू कामगिरी :
दुसऱ्या उपांत्या सामन्यात ग्रामीण पोलीस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद २०१ धावा केल्या. यामध्ये अजय काळेने ३६ चेंडूत ९ चौकारांसह ६१ धावांची खेळी केली. इम्रान खानने २९ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह नाबाद ४७ धावा, विशाल नरवडेने २६ चेंडूत १ षटकार व ५ चौकारांसह ४२ धावा तर विकास नगरकरने १८ चेंडूत २ चौकारांसह २३ धावांचे योगदान दिले. मसीआ ‘ब’ संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार मंगेश नितुरकरने ३३ धावांत २ गडी, मधुर पटेलने ३६ धावांत २ गडी, राम राठोडने ३० धावात २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मसीआ ‘ब’ संघ १९ षटकात १५२ धावांवर ढेपाळला. यामध्ये निकीत चौधरीने २४ चेंडूत ३ चौकारांसह २४ धावा, मधुर पटेलने १६ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २२ धावा, संदीप गायकवाडने २० चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह २२ धावा, कर्णधार मंगेश नितुरकरने १५ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २० धावा तर मयूर चौधरीने ८ चेंडूत १ षटकार व १ चौकारांसह १५ धावांचे योगदान दिले. ग्रामीण पोलीस संघातर्फे विकास नगरकरने २३ धावात ४ गडी, कर्णधार संदीप जाधवने ४८ धावात ४ गडी तर इम्रान खानने १८ धावांत २ गडी बाद केले.

Tags: 30th Shaheed Bhagat Singh Industrial T20 Cricket TournamentCity Paelis will compete for the Bhagat Singh CupGrameen Paelis
ShareTweetSend
Next Post

अखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस: आर्यन , सर्वज्ञ , तनिष्क , श्रावि , काव्या यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.