• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

किल्ले रायगडाच्या आशीर्वादाने चमकणार युवा खेळाडूंचे सोनेरी यश

by pravin
January 5, 2023
in बातम्या, राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
Reading Time: 1 min read
किल्ले रायगडाच्या आशीर्वादाने चमकणार युवा खेळाडूंचे सोनेरी यश
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे  शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगड वरून निघाली क्रीडा ज्योत, एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रागंणात महा ज्योतीचे आगमन महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ
पराक्रमी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगडच्या आशीर्वादाने आता युवा खेळाडूंचे दैदीप्यमान सोनेरी यश महाराष्ट्रातील क्रीडाविश्वाला झगमगटून टाकणार आहे.

किल्ले रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी ज्योत प्रज्वलित केल्यानंतर ऑलम्पियन खेळाडू  अजित लाकरा यांना सोपवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रागंणात गुरुवार ५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी 10 वाजता मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

किल्ले रायगड येथील क्रीडाज्योत प्रज्वलित सोहळ्यालामहाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद महाड, शिवछत्रपती पुरस्कारार्थी संजय कडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा गायकवाड, राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू सिद्धेश शिर्के मुख्य समन्वयक अमित गायकवाड, समन्वयक उदय पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्यातील आठही जिल्ह्यातून आलेल्या क्रीडाज्योती पुण्यातील एसएसपीएमएस येथे रायगड येथील मुख्य ज्योतीत विलीन करण्यात येणार आहेत.
ऐतिहासिक पुणे उजळून निघणार युद्धकालीन इतिहासाचा वारसा लाभलेले पुणे शहर आता महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या क्रीडा ज्योतने उजळून निघणार आहे. ही क्रीडाज्योत लाल महाल-कसबा गणपती-दगडूशेठ गणपती-समाधान चौक-तुळशीबाग चौक-शगुन चौक-भानु विलास टॉकिज चौक- अल्का टॉकीज छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून गाडीने फर्ग्यूसन मार्गे पुणे विद्यापीठ चौक-बाणेर फाटा या मार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी दुपारी १ वाजता पोहोचणार आहे.

रॅलीत मान्यवरांचा सहभाग

या रॅलीत खेलरत्न पुरस्कारार्थी अंजली भागवत, पदमश्री पुरस्कारार्थी शितल महाजन, ध्यानचंद पुरस्कारार्थी स्मिता यादव (शिरोळे), ऑलिम्पियन खेळाडू मारुती आडकर, धनराज पिल्ले, अजित लाकरा, विक्रम पिल्ले बाळकृष्ण आकोटकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वपनिल कुसाळे, रुतुजा भोसले, श्रद्धा तळेकर, अर्जून पुरस्कारार्थी निखील कानिटकर, शंकुतला खटावकर, शांताराम जाधव, रेखा भिडे, गोपाळ देवांग, मनोज पिंगळे, काका पवार, राहूल आवारे, नंदन बाळ, संदीप किर्तने, नंदू नाटेकर, सुयश जाधव व मुरलीकांत पेटकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती रॅली समन्वयक उदय पवार यांनी दिली आहे.

Tags: Fort RaigadGolden success of young players will shine with the blessings
ShareTweetSend
Next Post
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक तलवारबाजी क्रीडा स्पर्धेस जल्लोशात सुरुवात

महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक तलवारबाजी क्रीडा स्पर्धेस जल्लोशात सुरुवात

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.