• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

मैदाने खुली करण्याची औरंगाबाद ऑलम्पिक संघटनेची मागणी

by pravin
January 11, 2022
in अन्य खेळ, जिल्हास्तरीय, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबद:(प्रतिनिधी) कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे खेळाची मैदाने, व्यायामाचे ठिकाणे जॉगिंग पार्क आणि गार्डन बंद करण्यात आलेली आहे. मात्र त्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे आणि खेळाडूंना सराव करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे लवकरात लवकर ही सर्व ठिकाने  सुरू करावीत असे निवेद माननीय मुख्यमंत्र्यांना औरंगाबाद विभागाच्या क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे यांच्या मार्फत औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनच्या  वतीने देण्यात आले.

 

 

निवेदनात म्हटले की कोरोनाच्या  (कोवीड १९) आजारात लसीकरण, विलगीकरण, मास्क सॅनिटायझर आणि उपचारासह प्रतिकारशक्ती आणि सकारात्मक मानसिकतेची आवश्यकता असते. खेळाची मैदाने, व्यायामाची ठिकाणे, जॉगिंग पार्क आणि गार्डन मध्ये शारीरिक अंतर ठेवून केलेल्या हालचालीमुळे करोना संसर्गाचा धोका उद्भवत नाहीत. या उलट पुरेसा व्यायाम आणि खेळ यामुळे नागरिकांची प्रतिकारशक्ती व सकारात्मक मानसिकता विकसित होण्यास मदत होईल.

 

त्याशिवाय आगामी काळात स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यात सहभागी होऊन यश संपादन करण्याकरिता खेळाडूंना सराव अत्यंत महत्वाचा आहे. हा सराव नसेल तर ते अपेक्षित यश मिळू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची कित्येक वर्षांची मेहनत वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

आज हजारो खेळाडू घरामध्ये  खेलावाचून बनधिस्त आहेत. त्यांना सरावाची नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर खडक निर्बंधांचे आदेशामुळे क्रीडा प्रशिक्षकांचे उपजीविकेचे साधन देखील नाहीसे  झाले असून, त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ आलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन ही सर्व ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आणि खेळाडूंसाठी सुरू करावी, अशी मागणी औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशन तर्फे करण्यात आली. यावेळी औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद केंद्रे, कोषाध्यक्ष विश्वास जोशी, अभय देशमुख, महेश इंदापुरे, अनिल मिरकर, अजय दाभाडे, सुमित खरात, निखिल पवार यांची प्रतिनिधिक उपस्थिती होती.

Tags: aragabad omplice sanghtnacovid 19open sport groundpankj bhar saklekar
ShareTweetSend
Next Post

विराटनं जिंकला टॉस;‘या’ गोलंदाजाला मिळाली संधी!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.