• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

एन्ड्युरन्स एन्चँटर्स ठरले विजेते

by pravin
February 12, 2023
in क्रिकेट, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
एन्ड्युरन्स एन्चँटर्स ठरले विजेते
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

संभाजीनगर (प्रतिनिधी): एएसआर-मसिआ क्रिकेट स्पर्धेत रविवारी (ता. १२) झालेल्या अंतिम सामन्यात एन्ड्युरन्स एन्चँटर्स संघाने अवघ्या दोन धावांनी स्वजीत मीडियावर विजय मिळवला. स्पर्धेत ‘स्वजीत’चे अनिकेत गोरे मालिकावीर ठरले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याहस्ते विजेत्या, उपविजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

स्वजीत मीडिया इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याच्या निर्णय घेतला. एन्ड्युरन्स एन्चँटर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात आठ बाद १४४ धावा काढल्या. आशिष वर्दे (१० धावा), अमोल बेंद्रे (१८), सचिन पानसे (३१), शरद टाक (२०), दत्ता तोडकर (१०) यांच्यासह विनोद (१५) यांनी नाबाद धावांची तडाखेबाज खेळी केली. स्वजीत संघाने अतिरिक्त १६ धावा दिल्या. अनिकेत गोरे, किरण बदडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

स्वजीतच्या संघाने प्रत्युत्तरात कडवी झुंज दिली. अमोल म्हस्के (१५ धावा) अनिकेत गोरे (२४), संदीप लांडगे यांनी २६ चेंडूत ३१ तर, विजय भुजाडी यांनी चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने २६ चेंडूत ४२ धावा काढल्या. संघाला १४२ धावांपर्यंत मजल मारता आली. एन्ड्युरन्स संघाने अतिरिक्त १७ धावा दिल्या. अरुण अधाने यांनी चार गडी बाद केले. शेवटच्या षटकात १४ धावांची गरज असताना स्वजीत संघाचा अवघ्या दोन धावांनी पराभव झाल्याने उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. सामनावीराचा बहुमान अधाने यांना मिळाला.

पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी मसिआ अध्यक्ष किरण जगताप, उपाध्यक्ष भगवान राऊत, सचिव राहुल मोगल, मुख्य प्रायोजक श्रीधर नवघरे, माजी अध्यक्ष नारायण पवार, सुनिल किर्दक, एन्ड्युरन्सच्या एचआर प्रमुख प्रिती राज, स्वजीत मीडिया इलेव्हनचे विरेंद्र चव्हाण, स्वप्नील आहेर आदींची उपस्थिती होती. स्पर्धेसाठी अमित राजळे, राहुल घोगरे, राजेंद्र मगर, संदीप पन्नासे यांनी पुढाकार घेतला.

मालिकावीर – अनिकेत गोरे (स्वजीत मीडिया) – १०४ धावा, १४ गडी बाद
उत्कृष्ट फलंदाज – अजित पाटील (सिमेन्स सनरायजर्स) – १८६ धावा
उत्कृष्ट गोलंदाज – दुर्गेश जोशी (स्वजीत मीडिया) – ९ गडी बाद

खासदार कला क्रीडा महोत्सव घेणार – कराड

जी-२०च्या निमित्ताने शहरात चांगले वातावरण बनले आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी आपले योगदान दिले पाहिजे. मी देखील लवकरच ‘खासदार कला क्रीडा महोत्सव घेणार आहे. वॉर्ड पासून शहर पातळीवर सामने होतील. यात पाच प्रकारचे खेळ असतील. तसेच मी डॉक्टर असल्याने रुग्न कमी करायचे असतील तर, मैदाने वाढवले पाहिजेत. यासाठी यापुढच्या काळात प्रयत्न केले जातील. असे डॉ. भागवत कराड म्हणाले.

Tags: Endurance Enchanters were the winnersMasia Cricket Tournament
ShareTweetSend
Next Post
अजित सिड्स प्रा.लि. प्रायोजित संभाजीनगर खो-खो प्रीमियर लीगची शानदार सुरवात

अजित सिड्स प्रा.लि. प्रायोजित संभाजीनगर खो-खो प्रीमियर लीगची शानदार सुरवात

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.