• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खो-खोत महाराष्ट्रचा दुहेरी धमाका!

by pravin
March 4, 2025
in खो-खो, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
खो-खोत महाराष्ट्रचा दुहेरी धमाका!
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

हल्दवानी (प्रतिनिधी) गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो खो संघांनी आपल्या लौकिकास जागत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदके जिंकून दुहेरी धमाका केला. Tadalafil duration typically spans 36 hours, offering extended therapeutic effects for erectile dysfunction treatment. While effective, generic cialis can also interfere with other medications, making professional consultation essential. चुरशीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या महिलांनी ओडिशाचा ३१-२८ असा ३ गुणांनी पराभव करीत जेतेपद राखले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने मात्र, सव्वा सात मिनिटे राखून व ६ गुणांनी (३२-२६) असा पाडाव करीत रुबाबात पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली.

इंदिरागांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात  महाराष्ट्राला ओडिशाने कडवी लढत दिली. तिसऱ्या टर्नमध्ये संरक्षण करताना एका मिनिटात महाराष्ट्राचे तीन खेळाडू बाद झाल्याने धाकधूक वाढली होती. त्यातच गौरी शिंदे पळतीच्या वेळी पाय मुरगळून जायबंदी झाल्याने ओडिशाचा हुरूप वाढला होता. मात्र, वेळीच स्वतःला सावरत सांघिक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या महिलांनी सुवर्णपदक राखण्यात यश मिळविले. मध्यंतराला महाराष्ट्र कडे तीन गुणांची (15-12) आघाडी होती. महाराष्ट्राकडून प्रियांका इंगळे (१.३० मि. , १.५२ मि.  संरक्षण आणि ४ गुण), अश्विनी शिंदे (१.२३ मि. संरक्षण व १० गुण), संध्या सुरवसे (२.२४ मि., २.२३ मि. संरक्षण व २ गुण), रेश्मा राठोड (१.११ मि., १.४५ मि. संरक्षण आणि ४ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.  ओडिसाकडून अर्चना प्रधान (१ मि., १.३५ मि. संरक्षण आणि ४ गुण), सुभश्री सिंग (१.८ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी तोडीस तोड खेळ केला, पण त्यांना यंदाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पुरुष संघाला एकतर्फी जेतेपद
पुरूष गटात महाराष्ट्राने ओडिसाचा सव्वा सात मिनिटे राखून व ६ गुणांनी (३२-२६) धुव्वा उडवीत सुवर्णपदकावर रुबाबात नाव कोरले. महाराष्ट्राच्या रामजी कश्यप (२.२० मि., १.१० मि. संरक्षण व २ गुण), सुयश गरगटे (१.१० मि. संरक्षण व ६ गुण), अनिकेत चेंदवणेकर (१ मि. व २ मि. संरक्षण), प्रतिक वायकर (१ मि. संरक्षण व ६ गुण), शुभम थोरात (१.३० मि., १.२० मि. संरक्षण आणि २ गुण) यांनी भन्नाट खेळ केला. पराभूत ओडिशाकडून पाबनी साबर (१ मि. संरक्षण व ६ गुण), सुनिल पात्रा (१.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी महाराष्ट्राला दिलेली झुंज अपयशी ठरली.

अजित पवारांकडून कौतुकाची थाप
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघाने सुवर्णमय कामगिरी केल्याबद्दल दोन्ही संघाचे खेळाडू, प्रशिक्षक राजेंद्र साप्ते, पंकज चवंडे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सचिव डाॅ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अँड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

“महाराष्ट्राच्या दोन्ही खो खो संघांनी सलग चार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे. यासाठी सर्व जिल्हा संघटना, राज्य शासनाचे क्रीडा खाते, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन या सर्वांचे मनापासून आभार”.
– डॉ. चंद्रजित जाधव, सचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन

 

“माझ्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असली, तरी वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडू आमच्या संघात असल्याने जेतेपदाची खात्री होती. प्रशिक्षकांनी आमच्याकडुन चांगली तयारी करून घेतली होती. दावपेजा प्रमाणे खेळ होऊ न शकल्याने मोठा विजय मिळविता आला नाही, पण सुवर्णपदक राखण्यात यशस्वी ठरलो, त्यामुळे दिलासा मिळाला”.
 संपदा मोरे, कर्णधार

“आम्हीच सुवर्ण पदक जिंकणार याची खात्री होती. मात्र, आम्ही गाफील नव्हतो. खरं तर आम्ही सुवर्ण पदकाच्या लढाईत डावाने बाजी मारण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, हा विजयही तसा मोठाच आहे, यात वादच नाही”.
गजानन शेंगाळ, कर्णधार

Tags: 38th National Games Kho-Kho News38th National Games NewsDouble explosion of Kho-Khot Maharashtramaharashtra
ShareTweetSend
Next Post
मयुरी गायके क्रिकेट NIS सर्टिफिकेट कोर्स परीक्षेत उत्तीर्ण

मयुरी गायके क्रिकेट NIS सर्टिफिकेट कोर्स परीक्षेत उत्तीर्ण

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.