• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आकांक्षाला दुहेरी मुकुट

by pravin
April 12, 2022
in राज्यस्तरीय, लॉंग टेनिस
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

सोलापूर। सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(एसडीएलटीए) यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात नवी मुंबईच्या आकांक्षा नित्तूरे हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

एमएसएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, सोलापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महिला गटात एकेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित नवी मुंबईच्या आकांक्षा नित्तूरे हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुसऱ्या मानांकित सोलापूरच्या प्रगती सोलनकरचा 6-0, 6-3 असा सहज पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.

दुहेरीत अंतिम फेरीत नवी मुंबईच्या आकांक्षा नित्तूरे हिने आपली शहर सहकारी अलिशा देवगांवकरच्या साथीत सोलापूरच्या प्रगती सोलणकर व ज्योत्स्ना मदने या अव्वल मानांकित जोडीचा 6-2, 6-2 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेचे माजी राष्ट्रीय क्रिकेटपटू माया खंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, स्पर्धा निरीक्षक सेजल केनिया आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: महिला: एकेरी: उपांत्यफेरी:
आकांक्षा नित्तूरे(नवी मुंबई)[1] वि.वि.ज्योत्स्ना मदने(सोलापूर)[3] 4-0, 4-1
प्रगती सोलनकर(सोलापूर)[2] वि.वि.कांचन चौगुले(सोलापूर)[4] 4-1, 4-2
अंतिम फेरी: आकांक्षा नित्तूरे(नवी मुंबई)[1] वि.वि.प्रगती सोलनकर(सोलापूर)[2]6-0, 6-3;

दुहेरी गट: उपांत्य फेरी:
प्रगती सोलणकर(सोलापूर)/ ज्योत्स्ना मदने(सोलापूर)[1] वि.वि.तनया चौधरी(नागपूर)/कल्याणी सोमेवार(नागपूर)4-0, 4-2;
आकांक्षा नित्तूरे(नवी मुंबई)/अलिशा देवगांवकर(मुंबई उपनगर)[2] वि.वि.नुपूर गुप्ता(नाशिक)/तन्वी तावडे(पुणे)4-0, 4-0;
अंतिम फेरी: आकांक्षा नित्तूरे(नवी मुंबई)/अलिशा देवगांवकर(मुंबई उपनगर)[2] वि.वि.प्रगती सोलणकर(सोलापूर)/ ज्योत्स्ना मदने(सोलापूर)[1] 6-2, 6-2.

Tags: Akanksha NittureDouble crown for aspiration in Maharashtra State Women's Tennis ChampionshipDouble crown for aspiration in Maharashtra State Women's Tennis ChampionshipEighth Maharashtra State Women's Tennis ChampionshipsMaharashtra State Lawn Tennis AssociationSolapur District Lawn Tennis Association
ShareTweetSend
Next Post

राज्यस्तरीय जुनियर अजिंक्यपद स्पर्धेत अझमीर आणि हर्षिता यांना दुहेरी मुकुट

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.