• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

डॉजबॉल स्पर्धेत मुलांमध्ये एन. आर. स्पोर्ट्स अकॅडमी तर मुलींमध्ये ऑक्सफर्ड मुंबईला विजेतेपद

by pravin
October 12, 2021
in अन्य खेळ, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई -दिलीप अहिनवे

स्वाभिमान युथ क्लब व डी. एन. स्पोर्ट्स ॲण्ड हेल्थ क्लबने भिवंडीचे कार्यसम्राट नगरसेवक संतोष एम. शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑक्टोबर रोजी मान सरोवर येथील बास्केटबॉल मैदानात “स्वाभिमान डॉजबॉल चषक २०२१” चे अतिशय सुंदर आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये मुलांच्या १४ व मूलींच्या ९ अशा एकूण २३ संघांनी सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू नरेश राऊत यांनी स्पर्धांचे उत्तम नियोजन केले होते. मुलांमध्ये एन. आर. स्पोर्ट अकॅडमी व मूलींमध्ये ऑक्सफर्ड मुंबई यांनी विजेतेपद पटकावले. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्या संघांना अनुक्रमे दहा हजार, पाच हजार व तीन हजार रुपये रोख, चषक, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धांचे उदघाटन भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगरसेवक संतोष शेट्टी, निलेश चौधरी, श्यामजी अग्रवाल, दिपाली पाटील, हनुमान चौधरी, माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, समाजसेवक विठोबा नाईक (बिल्ला), अंबादास सिंघम, राजु चौघुले व मोहन बल्लेवार हे उपस्थित होते.
मुलांच्या अंतिम सामन्यात एन. आर. स्पोर्ट्स अकॅडमीने विवेकानंद स्कूल भिवंडी संघाचा २-० (३-०, ४-०) सेटने पराभव करुन विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर विवेकानंद स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एन. आर. स्पोर्ट्सच्या अभिषेक चौधरी, विकास बारीक, सुफियान शेख व सार्थक सिंगने अचूक मारा व उत्तम बचाव करुन उत्कृष्ट खेळी केली. तर विवेकानंद स्कूलच्या मनीष निराला, वैभव देशमुख, ओमकार गुलापेल्ली व तेजस डांगरे यांचे प्रयत्न अपूरे पडले. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात डिस्ट्रॅक्टिव्ह टेन संघाने ऑक्सफर्ड मुंबई संघावर २-० सेटने मात करुन बाजी मारली. डिस्ट्रॅक्टिव्ह संघाच्या निलेश देठे, साईराज परब, सोहम पाटील व अथर्व पालांडे यांनी सुंदर खेळी केली.


मूलींच्या अंतिम सामन्यात ऑक्सफर्ड मुंबई संघाने एन. आर. स्पोर्ट्स अकॅडमीचा २-० (२-०, १-०) सेटने पराभव करुन विजेतेपदाला गवसणी घातली. तर एन. आर. स्पोर्ट्सला उपविजेतेपद मिळाले. ऑक्सफर्ड मुंबईच्या सानिका पाटील, रिद्धी मेहरा, विधी चौधरी व आस्था शिंगाडे यांनी छान खेळ केला. तर एन. आर. स्पोर्ट्सच्या मुस्कान अन्सारी, प्रिया चव्हाण, मधु सिंग व तनु सिंग यांचा प्रतिकार अयशस्वी ठरला. तृतीय क्रमांक धामणगाव क्लबने मिळवला. धामणगावची प्रीती माळी, राजश्री माळी, प्रणाली भोईर व अनिषा माळी यांनी चांगली खेळी केली.
संपुर्ण स्पर्धांमधुन सर्वोत्तम खेळाडूंची निवड करुन त्यांना गौरविण्यात आले. बेस्ट शुटर म्हणून मुलांमधुन विकास बारीक ( एन. आर. स्पोर्ट्स अकॅडमी) व मूलींमधुन खुशी राजभर (ऑक्सफर्ड, मुंबई) तर बेस्ट डिफेंडर म्हणून मुलांमधून विवेक कुशवाह (विवेकानंद स्कूल, भिवंडी) व मूलींमधुन मुस्कान अन्सारी (एन. आर. स्पोर्ट्स अकॅडमी) यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय पंच नौशाद शेख (सातारा), आशिष जगताप (बीड), अमित आग्रे (रत्नागिरी), विक्रम माने (सातारा), दिलीप अहिनवे (ठाणे) व अनिल पाटील (ठाणे) यांनी पंच म्हणून उत्तम काम पाहिले. डी. एन. स्पोर्टचे अध्यक्ष विजय गुज्जा व स्वाभिमान युथ क्लबचे अध्यक्ष अनिल शेट्टी यांनी स्पर्धांचे आयोजन अतिशय उत्तमरीत्या केले होते.

Tags: एन. आर. स्पोर्ट्स अकॅडमीऑक्सफर्डडॉजबॉलतर मुलींमध्येमुंबईलाविजेतेपदस्पर्धेत मुलांमध्ये
ShareTweetSend
Next Post

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे निवड चाचणी स्पर्धा.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.