• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 22, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जोकोव्हिचबाबत निर्णय आज

by pravin
January 16, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, लॉंग टेनिस
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

विश्वातील अग्रगण्य टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचच्या कारकीर्दीत सुरू असलेले थरारनाटय़ दिवसेंदिवस रंगतदार वळण घेत आहे. शनिवारी जोकोव्हिचला पुन्हा अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये दाखल करण्यात आले असून, रविवारी त्याला परत पाठवणीबाबत होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे तमाम क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

 

 

 

ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला सोमवार, १७ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून ,जोकोव्हिचच्या समावेशाबाबत अद्याप संभ्रम आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियन सरकारने दुसऱ्यांदा जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला. परकीय नागरिकविषयक खात्याचे मंत्री (इमिग्रेशन मिनिस्टर) अ‍ॅलेक्स हॉक यांनी जोकोव्हिचबाबत नियमांशी तडजोड करण्यास नकार दर्शवल्याने रविवारी केंद्रीय न्यायालय या प्रकरणावर निर्णय देईल. शनिवारी ३४ वर्षीय जोकोव्हिचला असंख्य सुरक्षारक्षकांच्या बंदोबस्तात पुन्हा स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले. सकाळी त्याला सीमा सुरक्षा दलासमोर मुलाखतीसाठी हजर केले. या वेळी जोकोव्हिचचे वकील निकोलस वूडसुद्धा उपस्थित होते.

 

 

 

  • जोकोव्हिचला ठेवण्यात आलेल्या हॉटेलबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा घोळका जमला असून ऑस्ट्रेलियातील काही नागरिकसुद्धा जोकोव्हिचला पाठिंबा देण्यासाठी रस्तावर उतरले होते.

  •   जोकोव्हिचच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याने आयोजक रविवार सायंकाळपर्यंत पहिल्या दिवसाची कार्यक्रमपत्रिका जाहीर करणार नाहीत. जोकोव्हिचने माघार घेतल्यास त्याची जागा कार्यक्रमपत्रिकेत पाचवा मानांकित आंद्रे रुब्लेव्ह घेईल.  तसेच पात्रता फेरीतील एखादा स्पर्धक नशिबाच्या बळावर मुख्य फेरीसाठी पात्र होईल.

Tags: decision todaydjokovictenis
ShareTweetSend
Next Post

पराभवानंतरचा पंचनामा!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.