छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने, विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून, कुलगुरू प्रा.डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून, तसेच कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, यांच्या कुशल नेतृत्वाखाली, विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, अधिष्ठाता, वैधानिक अधिकारी, कायमस्वरूपी कर्मचारी, कंत्राटी कामगार व ईतर सर्वांसाठी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट, रस्सीखेच, व संगीत-खुर्ची पुरुष व महिला गटांच्या स्पर्धांचे आयोजन, दिनांक 7 ते 10 जानेवारी 2025 तारखेदरम्यान, आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धा बाद पध्दतीने खेळविण्यात येणार असून विजयी व उपविजयी खेळाडू व संघांना मेडल्स, ट्रॉफीज व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत अधिकाधिक विद्यापीठ कर्मचारी वर्गांनी स्पर्धेत सहभाग घेऊन संधीचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे डॉ. कैलास पाथ्रीकर, क्रीडा विभागाचे प्रभारी क्रीडा संघालक डॉ. संदीप जगताप, क्रीडा विभागातील सर्वश्री डॉ. मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, अभिजित दिकखत, किरण शूरकांबळे, गणेश कड, मोहन वहिलवार आदींनी केले आहे.





