• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 22, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

चिनी तैपईला नमवून थायलंडचा फिफा विश्वचषक स्पर्धेत प्रवेश;

by pravin
February 7, 2022
in फुटबॉल
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
नवी मुंबई – नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात व्हिएतनामने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत चिनी तैपईचे कडवे आव्हान २-१ गोलने परतावले. या विजयासह व्हिएतनामने २०२३ साली ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पधेर्चे तिकिट मिळवले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हिएतनामने पात्रता मिळवली असल्याने त्यांची कामगिरी ऐतिहासिक ठरली.

चेउंग थियू कियूने सातव्या आणि एनग्युयेन थी बिच थूय हिने ५६व्या मिनीटाला गोल करत व्हिएतनामच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. चिनी तैपईकडून एकमेव गोल हेइ सुआनने दुसऱ्या सत्रात केला. या पराभवानंतर चिनी तैपई संघ आता इंटर-कॉन्फेडरनेश प्ले ऑफ लढतीत थायलंडविरुद्ध खेळतील. या लढतीत विजय मिळवल्यास ३१ वर्षांत पहिल्यांदाच चिनी तैपई संघ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेची पात्रता गाठतील.

शुक्रवारी थायलंडला ३-० गोलने नमविलेल्या चिनी तैपईला विश्वचषक पात्रता मिळवण्यासाठी व्हिएतानमविरुद्ध केवळ बरोबरी साधण्याची आवश्यकता होती. परंतु, व्हिएतनामने आक्रमक सुरुवात करता चिनी तैपईला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. सातव्याच मिनिटाला चिनी तैपईचा बचाव भेदण्यात व्हिएतनामला यश आले. चेउंग थियू कियूने गोल करत व्हिएतनामला १-० गोल अशी आघाडी मिळवून दिली.

पहिल्या गोलनंतर व्हिएतनामच्या संघात उत्साहात संचारला आणि त्यांनी १९व्या मिनीटालाही गोल करण्याची संधी निर्माण केली. मात्र, चेन-पिंगने व्हिएतनामचे आक्रमण रोखले. यानंतर पहिल्या सत्रात कोणलाही गोल करता आला नाही. चिनी तैपईने दुसऱ्या सत्रात शानदार खेळ करताना गोल केला. ४९व्या मिनिटाला सू हेइ सुआनने डाव्या कॉर्नरने गोल करत चिनी तैपईला १-१ गोल बरोबरी साधून दिली. यावेळी चिनी तैपईने सामन्यावर चांगले नियंत्रण मिळवले.

परंतु, ५६व्या मिनिटाला एनग्युयेन थी बिच थूय हिने शानदार गोल करत व्हिएतनामला २-१ गोल असे आघाडीवर नेले. व्हिएतनामने यानंतर भक्कम बचावाचे प्रदर्शन करत अखेरपर्यंत आघाडी कायम राखली आणि विजय मिळवला. या निर्णायक गोलच्या जोरावर व्हिएतनामने फिफा विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळवली.
Tags: AFC Women's Asian Cup India 2022Chinese TaipeiFootballNamwon Thailand
ShareTweetSend
Next Post

चायना पीआरने पटकावले नववे विजेतेपद;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.