• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 22, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

न्यूझीलंड कॅप्टन केन झाला टीम इंडियावर भलताच खूश; स्तुतीसुमने उधळत म्हणाला…

by pravin
November 18, 2021
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेची बुधवारी (१७ नोव्हेंबर) सुरुवात झाली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. सामन्यात भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन  विलियम्सन विश्रांतीवर होता. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज टिम साउदीने संघाचे नेतृत्व केले. तत्पूर्वी, पहिला टी२० सामना खेळण्यापूर्वी विलियम्सनने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. त्याच्या मते भारतीय संघासोबत खेळणे सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे.

न्यूझीलंड संघाच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून विलियम्सनने भारतीय संघाचे कौतुक केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. तो या व्हिडिओमध्ये म्हटला की, “जेव्हा तुम्ही भारतासोबत खेळता, तेव्हा हे या खेळातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक असते. क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात त्यांच्याकडे जी खोली आहे आणि प्रत्येक खेळाडूकडे गुणवत्ता आहे, ती अविश्वसनीय आहे. त्यामुळेच जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा आहे.”

दरम्यान, न्यूझीलंडचा नियमित कर्णधार मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या व्यस्त वेळापत्रकानंतर या टी२० मालिकेदरम्यान विश्रांतीवर आहे. विलियम्सन टी२० मालिका संपल्यानंतर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करताना दिसेल. विलियम्सनप्रमाणेच भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीही टी२० मालिकेदरम्यान विश्रांतीवर आहे. विराट कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संघात पुनरागमन करेल. कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे.

बुधवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर मार्टिन गप्टिलने सर्वाधिक ७० आणि मार्क चॅपमनने ६३ धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ विकेट्सच्या नुकसानावर १९.४ षटकात विजय मिळवला. भारतासाठी सलामीवीर रोहित शर्मा (४२) आणि सूर्यकुमार यादव (६२) यांनी महत्वाची खेळी केली.

Tags: न्यूझीलंड कॅप्टन केनz झाला टीम इंडियावरभलताच खूश
ShareTweetSend
Next Post

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक मनीषा वाघमारे यांनी आमा दबलम पर्वत येथे भारताचा तिरंगा फडकावला.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.