• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

बोपण्णा-रामनाथन जोडीला जेतेपद ;टेनिस स्पर्धा

by pravin
February 7, 2022
in लॉंग टेनिस
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे : भारतीय जोडीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित  पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी ल्युक सेव्हिल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ या अग्रमानांकित ऑस्ट्रेलियन जोडीवर मात केली.

पुणे येथे रंगलेल्या या स्पर्धेतील पुरुष दुहेरीचा अंतिम सामना बोपण्णा-रामनाथन जोडीने ६-७ (१०), ६-३, १०-६ असा जिंकला. एक तास आणि ४४ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्याचा पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करण्यात भारतीय जोडीला यश आले. बोपण्णाच्या कारकीर्दीतील हे एकूण २१वे, तर रामनाथनचे दुसरे एटीपी दुहेरी जेतेपद ठरले. तसेच एकत्रित खेळताना हे त्यांचे दुसरे एटीपी जेतेपद आहे. त्यांनी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेपूर्वी झालेली अ‍ॅडलेड आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.

अंतिम सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही जोडय़ांनी चांगली सव्‍‌र्हिस केली. बोपण्णा-रामनाथन जोडीकडे ३-२ अशी आघाडी होती आणि ते सहाव्या गेममध्ये ४०-३० असे पुढे होते. मात्र स्मिथ त्याची सव्‍‌र्हिस राखण्यात यशस्वी ठरला. दोन्ही जोडय़ांनी पुढेही उत्तम खेळ सुरू ठेवल्याने ६-६ अशी बरोबरी झाली. त्यामुळे टायब्रेकर खेळवण्यात आला आणि यात सेव्हिल-स्मिथ जोडीने बाजी मारली.

दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा-रामनाथन जोडीने दमदार पुनरागमन केले. त्यांनी ऑस्ट्रेलियन जोडीची सव्‍‌र्हिस दोन वेळा मोडत हा सेट ६-३ असा मोठय़ा फरकाने जिंकला. त्यामुळे विजेती जोडी ठरवण्यासाठी सुपर टायब्रेकर खेळवण्यात आला. यात बोपण्णा-रामनाथन जोडीने १०-६ अशी सरशी साधत मायदेशातील या स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले.

 

Tags: BopannamaharashtraRamanathantataTENNIS
ShareTweetSend
Next Post

क्रिकेटपटू रैनाच्या वडिलांचे निधन;शेअर केली भावनिक पोस्ट

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.