• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जागतिक तलवारबाजी दिनानिमीत्त अत्याधुनिक तलवारबाजी हॉलचे भूमिपूजन

by pravin
September 12, 2021
in खेळ ( वैयक्तिक), तलवारबाजी, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

कोल्हापुर(प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरु झालेला व महाराष्ट्राची लढाऊ वृत्ती अधोरेखित करणारा खेळ म्हणजे ‘तलवारबाजी आज जागतिक तलवारबाजी दिनानिमीत्त कोल्हापुरातील पॅव्हेलियन मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तलवारबाजी हॉलचे भूमिपूजन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विडा उचलला आणि त्यात युद्धकलेला अनन्यसाधारण महत्त्व दिले. तलवारबाजी, दांडपट्टा यांसारखे युद्धकलेचे प्रकार महाराष्ट्राच्या मातीत अगदी खोलवर रुजले आहेत. तलवारबाजी या प्राचीन युद्धकलेने प्रगत तंत्रांचा वापर करत आधुनिक रूप धारण केले आहे.

जगभरात आधुनिक तलवारबाजीचा प्रसार व प्रचार जोमाने सुरू असताना तलवारबाजी सारखा शिवकालीन खेळ महाराष्ट्रामध्ये अधिक प्रभावीपणे विकसित व्हावा यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.आधुनिक साहित्यासह राष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण व इतर सुविधा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात तलवारबाजी अकादमी अर्थात फेंसिंग ॲकॅडेमी विकसित करण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले असून त्याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचा मानस आहे.

तलवारबाजी खेळात गेल्या शंभर वर्षांमध्ये अमूलाग्र प्रगती होऊन तलवारबाजी हा संपूर्ण खेळ इलेक्ट्रॉनिक साहित्याद्वारे खेळला जात आहे. त्यामुळे या क्रीडाप्रकाराकडे युवापिढी आकर्षित होत आहे.कोल्हापुरातील खेळाडूंना कोल्हापूरमध्येच अत्याधुनिक सोयी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या वर्षी टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तामिळनाडूच्या तलवारबाज भवानी देवी ने प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करून इतिहास रचला आहे. त्यातून प्रेरणा घेऊन पुढील ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे तसेच देशातील जास्तीत जास्त तलवारबाजपटू कसे झळकतील यासाठीचे आमचे प्रयत्न सुरु आहेत.

आ. ऋतुराज पाटील, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक दुधारे, कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे, सचिव डॉ. उदय डोंगरे, राजकुमार सोमवंशी, शेषनारायण लोढे, दिलीप घोडके, विकास वाघ, डॉ. पांडुरंग रणमाळ, प्रशांत जगताप, राजू शिंदे, विनय जाधव, पद्माकर जगदाळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्वप्नील तांगडे, तुषार आहेर, माजी नगरसेवक-नगरसेविका, श्रीराम सोसायटी चेअरमन व संचालक, खेळाडू आदी उपस्थित होते.

ShareTweetSend
Next Post

कुस्त्यांची दंगल:बाबासाहेब चव्हाण आणि जगदीश परदेशी अंतिम फेरीत विजयी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.