• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच कोलकाताला जबर धक्का

by pravin
March 24, 2022
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. पहिला सामना मागच्या हंगामातील विजेता आणि उपविजेता संघ, म्हणजेच चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. केकेआरला आगामी हंगामातील पहिला सामना खेळण्याचा मान मिळाला असला, तरी त्यांच्या संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि दिग्गज फलंदाज ऍरॉन फिंच आगामी आयपीएल हंगामातील पहिल्या पाच सामन्यांसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, जे आधीपासून अपेक्षित होते. केकेआरचा मेंटॉर डेविड हसीने याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.

कोलकाता नाईट रायडर्स  संघाने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात ऑस्ट्रेलायाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स याला खरेदी करण्यासाठी ७.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच ऍरॉन फिंच  एका बदली खेळाडूच्या रूपात संघासोबत सहभागी झाला आहे.

इंग्लंडचा फलंदाज एलेक्स हेल्सने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर केकेआरने फिंचला १.५० कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले. असे असले तरी, आता हे दोन्ही महत्वाचे खेळाडू पहिल्या पाच सामन्यांमध्ये केकेआरचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. यामागचे कारण आहे, ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा.

केकेआरचा मेंटॉर डेविड हसीने कमिन्स आणि फिंच यांच्या अनुपस्थितीवर महत्वाची प्रतिक्रिया दिली. तो म्हणला, “होय, या दोन्ही खेळाडूंची गैरहजेरी आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. प्रत्येकच संघाला वाटते की, त्यांचे सर्वश्रेष्ठ खेळाडू सोबत असावे. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा महत्वाचे काहीच नसले पाहिजे. प्रत्येक खेळाडूला स्वतःच्या देशासाठी क्रिकेट खेळायचे असते. त्यामुळे त्यांच्या काही जबाबदाऱ्या असतात. मला वाटते की, कमिन्स आणि फिंच सुरुवातीच्या ५ सामन्यांना उपस्थित राहू शकणार नाहीत. पण ते फिट आहेत आणि याठिकाणी येताच खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असतील.”

सध्या ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. कसोटी मालिकेतील तिसरा सामना सध्या लाहोरमध्ये खेळला जात आहे. हा दौरा ५ एप्रिलला संपणार असून त्यानंतर कमिन्स आणि फिंच भारतासाठी रवाना होऊ शकतात. कसोटी मालिकेत कमिन्स, तर एकदिवसीय मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी फिंचवर आहे.

भारतात आल्यानंतर या दोघांनाही तीन दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. म्हणजेच ८ एप्रिलपर्यंत दोघेही केकेआरच्या बायो बबलमध्ये सहभागी होऊ शकतात. केकेआराला त्यांचा पाचवा सामना १० मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी संघात या दोन्ही दिग्गजांचे आगमन होईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

Tags: Aaron FinchBCCICricketIndian premier league 2022iplipl2022kkrPat Cummins
ShareTweetSend
Next Post

16 व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.