• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वीचं CCTV फुटेज समोर;

by pravin
March 9, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

ऑस्ट्रेलिया –थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी काही दिवसांच्या ट्रीपवर गेलेल्या वॉर्नच्या ट्रीपच्या दुसऱ्या दिवशीच मृत्यू झाला. तो ५२ वर्षांचा होता.

ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या निधनानंतर त्याचा शिवविच्छेदनाचा अहवाल समोर आलाय. यामध्ये त्याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचं म्हटलं असून त्याबद्दल कोणताही संशय नसल्याचा उल्लेख केलाय. दरम्यान शेन वॉर्नच्या मृत्यूसंदर्भात रोज नवीन नवीन माहिती आणि खुलासे समोर येत आहेत. शेन वॉर्न थायलंडमधील ज्या रिसॉर्टमध्ये थांबला होता तेथील सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेन वॉर्न आणि त्याच्या मित्रांना मजास देण्यासाठी थायलंडमधील चार महिला रिसॉर्टमध्ये आल्याचं दिसत आहे. मात्र या सीसीटीव्ही फुटेजचा वेळ हा शेन वॉर्नच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतरचा आहे.

 

नक्की घडलं काय?

डेलीमेल डॉट को डॉट युकेने दिलेल्या वृत्तानुसार एका महिलेने रिसॉर्टच्या रिसेप्शनवर आपण शेन वॉर्नला फूटमसाज देण्यासाठी आल्याचं सांगत प्रवेश केला. मात्र ती महिला जेव्हा त्या वॉर्नच्या रुमच्या दरवाजाजवळ गेली आणि तिने दरवाजा वाजवला तेव्हा दरवाजा उघडण्यात आला नाही. त्यानंतर आत रुममध्ये वॉर्न मृतावस्थेत पडल्याचं नंतर समोर आलं. ४ मार्च रोजी वॉर्नचं थायलंडमधील सामुजान व्हिला येथे निधन झालं. तो त्याच्या मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता.

महिलांनी काय माहिती दिली?

या महिलेने दिलेल्या माहितीनुसार ती शेन वॉर्नच्या रुमजवळ पोहचली आणि तिने दरवाजा वाजला तेव्हा आजमधून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या महिलेने तिच्या बॉसला मेसेज करुन वॉर्न दरवाजा उघडत नाहीय अशी माहिती दिली. या महिलेला दरवाजा उघडता आला नाही तेव्हा वॉर्नच्या मित्रांनी दरवाजा उघडला. या साऱ्या प्रकारानंतर काही वेळातच वॉर्नचं निधन झाल्याची माहिती समोर आली. सर्वांनी रुममध्ये प्रवेश केला तेव्हा वॉर्न मृतावस्थेत आढळून आला. त्याला सीपीआर म्हणजेच तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न एका मित्राने केला. तितक्यात दुसऱ्याने रुग्णवाहिका बोलावली. मात्र रुग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच वॉर्नचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार वॉर्न आणि त्याच्या मित्रांनी संपूर्ण मसाजसाठी बुकिंग केली होती. मात्र वॉर्नने रुमचा दरवाजा न उघडल्याने त्यांनी इतर मित्रांशी संपर्क साधून दरवाजा उघडला.

 

वॉर्नला शेवटचं जिवंत पाहणाऱ्या त्या दोघीच…

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेज हे स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या आसपासचं आहे. मजास करण्यासाठी आलेल्या चार महिलांपैकी दोन महिला वॉर्नच्या रुमकडे गेल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याच दोन महिला आहेत ज्यांनी वॉर्नला शेवटचं जिवंत पाहिलं होतं.

Tags: CricketDiedPhoto
ShareTweetSend
Next Post

क्रिकेटमधील दोन नियम बदलल्यानंतर; सचिन तेंडुलकर म्हणाला

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.