• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जोकोव्हिचवर टांगती तलवार ;

by pravin
January 15, 2022
in लॉंग टेनिस
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
विश्वातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारकडून शुक्रवारी दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर परत पाठवणीची टांगती तलवार असून त्याच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळाल्यावर मागील आठवडय़ात मेलबर्नमध्ये दाखल झालेल्या जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने रद्द केला होता. मात्र, न्यायालयाने सोमवारी सरकारचा निर्णय मागे घेतला. परंतु परकी नागरिकाविषयक खात्याचे मंत्री (इमिग्रेशन मिनिस्टर) अॅललेक्स हॉक यांनी विशेष अधिकार वापरत शुक्रवारी लोकहितास्तव जोकोव्हिचचा व्हिसा पुन्हा रद्द केला.

 

 

 

ऑस्ट्रेलियात करोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून शुक्रवारी १ लाख ३० हजार नव्या बाधितांची नोंद झाली. ऑस्ट्रेलियन स्पर्धा १७ जानेवारीपासून मेलबर्न येथे होणार असून व्हिक्टोरिया राज्यात ३५ हजार नवे करोनाबाधित आढळले. ‘‘हा काळ प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकासाठी अवघड असून त्यांना बरेच त्याग करावे लागले आहेत. त्यांचा विचार करूनच परकी नागरिकविषयक खात्याच्या मंत्र्यांनी हे पाऊल उचलले,’’ असे पंतप्रधान मॉरिसन म्हणाले. दुसऱ्यांदा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय झाल्यावर जोकोव्हिचच्या वकिलांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. हॉक यांचा निर्णय पूर्णपणे तर्कहीन आहे, असे वकील निकोलस वूड यांनी न्यायालयाला सांगितले. जोकोव्हिचमुळे ऑस्ट्रेलियात लसीकरणविरोधी भावना निर्माण होईल, असा हॉक यांचा दावा आहे. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे वूड यांनी म्हटले. न्यायाधीश अँथनी केली यांनी हे प्रकरण फेडरल न्यायालयात पाठवले असून अंतिम सुनावणी रविवारी होऊ शकेल.

 

 

 

जोकोव्हिचला शनिवारी ऑस्ट्रेलियातील स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वाजता ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलासमोर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले जाईल. मग सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत त्याला वकिलांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दल त्याला पुन्हा ताब्यात घेईल. रविवारी होणाऱ्या परत पाठवणीच्या सुनावणीच्या वेळी तो वकिलांच्या कार्यालयात उपस्थित असेल.

Tags: australiancompetitionopen tennis
ShareTweetSend
Next Post

जागतिक दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमचे उद्घाटन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.