• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

चारशे मीटर धावण्यामध्ये राष्ट्रीय विक्रमासह ऐश्वर्या मिश्राची सोनेरी कामगिरी

by pravin
October 1, 2022
in ॲथलेटिक्स, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

ॲथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राचे आव्हान राहताना ऐश्वर्या मिश्रा हिने ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तिची सहकारी डांयड्रा व्हॅलेदारेस हिने महिलांच्या शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत ब्रॉंझपदकाची कमाई केली तर आंतरराष्ट्रीय खेळाडू संजीवनी जाधव हिनेदेखील पाच हजार मीटर शर्यतीत ब्रॉंझपदक पटकाविले. पुरुषांच्या चार बाय शंभर मीटर्स धावण्याच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राला ब्रॉंझपदक मिळाले.

ऐश्वर्या हिने सुरुवातीपासूनच आत्मविश्वास दाखवीत चारशे मीटर्सचे अंतर ५२.६२ सेकंदात पार केले आणि बीनामोल हिचा अकरा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. बीनामोल हिने २००१ मध्ये ही शर्यत ५२.७१ सेकंदात पार करीत राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. ऐश्वर्या हिने शेवटच्या ५० मीटर्स अंतरात वेग वाढविला व ही शर्यत जिंकली. तिने आंध्र प्रदेशची खेळाडू ज्योतिकाश्री व उत्तर प्रदेशची रूपल कुमारी यांच्यावर मात केली.

महिलांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत संजीवनी जाधव हिने ब्रॉंझपदक पटकाविताना हे अंतर १६ मिनिटे ३९.९७ सेकंदात पूर्ण केले. ती नाशिक येथे  विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. व्हॅलेदारेस हिने शंभर मीटर्स अंतराची शर्यत ११.६२ सेकंदात पूर्ण केली. ती नवी मुंबई येथे फादर ॲग्नेल अकादमीत सराव करते.

पुरुषांच्या शंभर मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राचे प्रणव गुरव (१०.५६सेकंद) किरण भोसले व जय शहा (दोन्ही प्रत्येकी १०.६० सेकंद) हे तीन खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते तथापि त्यांना पदक मिळवण्यात अपयश आले. त्यांना अनुक्रमे पाचवे सहावे व सातवे स्थान मिळाले. अमलान बोर्गोहेन (१०.३८सेकंद), व्ही. एलाकिदास (१०.४४ सेकंद), शिवकुमार (१०.४४ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व ब्रॉंझपदक मिळविले. पुरुषांच्या चार बाय शंभर मीटर रिले शर्यतीत महाराष्ट्राला अगोदर चौथे स्थान मिळाले होते. तथापि ब्रॉंझपदक मिळवणाऱ्या सेनादल संघास अपात्र ठरविण्यात आल्यामुळे महाराष्ट्राला तिसरे स्थान देण्यात आले. महाराष्ट्राने ही शर्यत ४०.६७ सेकंदात पार केली. तामिळनाडू (४०.०१) व केरळ (४०.४५सेकंद) यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक मिळाले.

 

Tags: 36th National Sports Tournament NewsAishwarya Mishra's goldenAishwarya Mishra's golden performance with national record in 400m run
ShareTweetSend
Next Post
महाराष्ट्राच्या स्केटिगपटूंची धमाल एकूण आठ पदकांची कमाई

महाराष्ट्राच्या स्केटिगपटूंची धमाल एकूण आठ पदकांची कमाई

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.