• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

रोहित शर्माच्या गळ्यात भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची माळ

by pravin
December 9, 2021
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी  भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात १८ जणांना संधी देण्यात आली. यासह निवड समितीने व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्माकडे टी२० सह वनडे संघाचे नेतृत्वदेखील देऊ केले आहे. या दौऱ्यावर आता रोहित पूर्णवेळ वनडे संघाचा कर्णधार म्हणून काम पाहिल.

निवड समितीची घोषणा
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भारतीय संघाचा हा दौरा सुरू होईल. तत्पूर्वी, दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली गेली. कसोटी संघाचे नेतृत्व नियमित कर्णधार विराट कोहली करेल. मात्र, अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याची उपकर्णधार पदावरून गच्छंती झाली. त्याच्या जागी आता रोहित कसोटी संघाचा उपकर्णधारपद भूषवेल.

नुकताच बनला होता टी२० संघाचा कर्णधार
टी२० विश्वचषकानंतर विराट कोहली याने टी२० संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर, उपकर्णधार रोहित शर्माची त्याच्या जागी नियमित टी२० कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली होती. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत ३-० असा विजय मिळवलेला.

कर्णधार म्हणून शानदार कामगिरी
रोहित शर्मा  हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा स्पर्धेचे विजेतेपद नावावर केले आहे. याव्यतिरिक्त त्याने अनेकदा विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या टी२० व वनडे संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने. निदहास ट्रॉफी  व २०१८ आशिया चषक  स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

The All-India Senior Selection Committee also decided to name Mr Rohit Sharma as the Captain of the ODI & T20I teams going forward.#TeamIndia | @ImRo45 pic.twitter.com/hcg92sPtCa

— BCCI (@BCCI) December 8, 2021

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक

वनडे मालिका
पहिला वनडे सामना – १९ जानेवारी २०२२, पर्ल
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी, २०२२, पर्ल
तिसरा वनडे सामना – २३ जानेवारी, केपटाऊन

कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी, केपटाऊन

Tags: 2018 Asia CupIndia Tour Of South AfricaMUMBAI INDIANSNew ODI Captain Rohit SharmaNidhas TrophyRohit Sharma
ShareTweetSend
Next Post

आयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाजांची जबरदस्त झेप;अश्विनची एका स्थानावर प्रगती

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.