• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

एएफसी वुमन्स आशिया कप स्पर्धा आता निर्णायक वळणावर;

by pravin
January 29, 2022
in फुटबॉल
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड २०२३ येथे होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रतेचा मार्ग आता अधिक मोकळा झाला आहे. एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेच्या रंगतदार साखळी लढतीनंतर आता बाद फेरीसाठी आठ संघ निश्चित झाले आहेत.

 

आठवेळचे विजेते चीन, गतविजेते जपान, ऑस्ट्रेलिया, महिला आशिया कप २०१० विजेते कोरिया प्रजासत्ताक, चायनीज तैपेई, फिलिपीन्स, व्हिएतनाम आणि थायलंड हे आठ संघ आता उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत. या संघाची एकूण कामगिरी बघता आता ३० जानेवारी रोजी होणारे सामने अधिक उत्कंठावर्धक होणार आहेत. 

 

या स्पर्धेतील पहिले पाच संघ पुढील वर्षी होणाऱ्या महिला विश्वकरंडक स्पर्धेसाठी , तर दोन संघ इंटर कॉन्फेडरेशन प्ले ऑफ लढतीसाठी पात्र ठरणार आहेत. यामुळे या फेरीची रंगत अधिक वाढली आहे .विश्वकरंडक स्पर्धेचे यजमान म्हणून ऑस्ट्रेलिया यापूर्वीच विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे फिलिपिन्स संघाच्या प्रगतीवर सगळे अवलंबून असणार आहे.

 

एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास चार पराभूत संघ २ फेब्रुवारी रोजी डी.वाय. पाटील मैदानावर होणाऱ्या प्ले ऑफ लढतीत खेळतील. या लढतीतील दोन विजेते विश्वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील, तर पराभूत संघ इंटर कॉन्फेडरेशन प्ले ऑफ स्पर्धेत खेळतील.

 

ऑस्ट्रेलियाची मोहिम उपांत्यपूर्व फेरीतच खंडित झाली, तर उपांत्यपूर्व फेरीतील तीन पराभूत संघ प्ले ऑफ लढतीत एकाच राऊंड रॉबिन पद्धतीत खेळतील. विजेता संघ विश्वकरंडक स्पर्धेत खेळेल, तर उर्वरित दोन संघ इंटर कॉन्फेडरेशन स्पर्धेत खेळतील.

 

 

Tags: afcASIA CUP 2022Footballwomens
ShareTweetSend
Next Post

थलायवासचा पराभव करत ;पाटणा पायरेट्सने रचला इतिहास

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.