• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, August 17, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

क्रीडा विभागातील मोठी बातमी: राज्यातील १६ तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि मुदतवाढ; पाहा संपूर्ण यादी

by pravin
July 1, 2026
in अन्य खेळ, बातम्या
Reading Time: 2 mins read
क्रीडा विभागातील मोठी बातमी: राज्यातील १६ तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि मुदतवाढ; पाहा संपूर्ण यादी
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

स्पोर्ट्स पॅनोरमा | मुंबई

राज्यातील तालुका क्रीडा अधिकारी (गट-ब, राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी (३० जून) शासन आदेश जारी करत राज्यातील १६ तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून चार अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरचे तालुका क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे बदली करण्यात आली आहे. तर कणकवलीचे तालुका क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे यांची पुणे मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही आदेशात समावेश आहे.

शासनाने संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी विहित मुदतीत रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक कामकाजासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित जबाबदारी पूर्ण होईपर्यंत कार्यमुक्त करू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

खालीलप्रमाणे अधिकाऱ्यांची नवीन पदस्थापना आणि मुदतवाढ करण्यात आली आहे:

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी:

अ.क्र.अधिकाऱ्याचे नावसध्याची पदस्थापनाबदलीनंतरची नवीन पदस्थापना
१.श्री. राजेंद्र अतनूरमाणगांव (जि. रायगड)जत (जि. सांगली)
२.श्री. अविनाश टिळेइगतपुरी (जि. नाशिक)नांदगांव (जि. नाशिक)
३.श्री. अरविंद चौधरीनांदगांव (जि. नाशिक)इगतपुरी (जि. नाशिक)
४.श्री. जगदीश चौधरीचाळीसगाव (जि. जळगांव)ऐरंडोल (जि. जळगांव)
५.श्री. श्याम देशपांडेकणकवली (जि. सिंधुदुर्ग)मुख्यालय, पुणे
६.श्री. सुरेंद्र कराडरेणापूर (जि. लातूर)गेवराई (जि. बीड)
७.श्री. बाजीराव देसाईगंगापूर (जि. छ. संभाजीनगर)कणकवली (जि. सिंधुदुर्ग)
८.श्री. जयकुमार टेंभरेकळमनुरी (जि. हिंगोली)खेड (जि. पुणे)
९.श्री. चारुदत्त नाकटलाखांदूर (जि. भंडारा)पातुर (जि. अकोला)
१०.श्रीमती जयश्री देवकरकोरपणा (जि. चंद्रपूर)खटाव (जि. सातारा)
११.श्री. मिलिंद काटोलकरमेहकर (जि. बुलढाणा)अचलपूर (जि. अमरावती)
१२.श्रीमती प्राजक्ता सावंतकुर्ला (जि. मुंबई उपनगर)सालेकसा (जि. गोंदिया)

दरम्यान, भूमचे श्रीकांत हरनाळे, मुलचे विनोद ठिकरे, मुर्तीजापूरचे सतीशचंद्र भट आणि देऊळगाव राजाचे बाळकृष्ण महानकर यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

 

Tags: Sports News MaharashtraSports Panoramaकणकवलीक्रीडा अधिकारी बदलीक्रीडा प्रशासनक्रीडा विभागगंगापूरतालुका क्रीडा अधिकारीबदलीबाजीराव देसाईमहाराष्ट्र क्रीडामहाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभाग
ShareTweetSend
Next Post
शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे 2026-27 चे संभाव्य यजमानपद जाहीर; महाराष्ट्राला पाच स्पर्धांचे आयोजन

शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे 2026-27 चे संभाव्य यजमानपद जाहीर; महाराष्ट्राला पाच स्पर्धांचे आयोजन

ताज्या बातम्या

शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रश्नांकडे महापौर-मनपा आयुक्तांनी थेट लक्ष द्यावे; क्रीडा क्षेत्रातून मागणी

शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रश्नांकडे महापौर-मनपा आयुक्तांनी थेट लक्ष द्यावे; क्रीडा क्षेत्रातून मागणी

स्वातंत्र्यदिनी क्रीडा क्षेत्राला २५ कोटींची मोठी भेट; पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

स्वातंत्र्यदिनी क्रीडा क्षेत्राला २५ कोटींची मोठी भेट; पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

मल्लखांब अनुदान प्रकरणात नवा सवाल; मूळ निकषात ‘ऑलिम्पिक खेळ’ अट, टिपणीत मात्र ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न संघटना’ असा उल्लेख!

मल्लखांब अनुदान प्रकरणात नवा सवाल; मूळ निकषात ‘ऑलिम्पिक खेळ’ अट, टिपणीत मात्र ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न संघटना’ असा उल्लेख!

गॉलमध्ये तिरंग्याला सलाम! टीम इंडियाने स्वातंत्र्यदिन साजरा करत रचला ऐतिहासिक क्षण

गॉलमध्ये तिरंग्याला सलाम! टीम इंडियाने स्वातंत्र्यदिन साजरा करत रचला ऐतिहासिक क्षण

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.