• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 18, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गुणवंत राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव

by pravin
May 31, 2025
in जिल्हा, तलवारबाजी, पुरस्कार
Reading Time: 1 min read
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गुणवंत राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना घडविणाया राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटन यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणेया ही वर्षी (वर्ष दहावी)तलवारबाजी, सॉफ्टबॉल बेसबॉल खेळातील खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.अशा खेळाडुंच्या मातांच गौरव सोहळा दि . 30 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होते.
या प्रसंगी फुलंब्री मतदार संघाचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य फुलचंद सलामपुरे, ए बी स्कूलचे संचालक  भाऊसाहेब काळे, राज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे, सचिव डॉ. दिनेश वंजारे, माजी राष्ट्रीय खेळाडू स्वप्निल शेळके, आकाश आरमाळ, सागर मगरे, अजय त्रिभुवन , क्रीडा शिक्षक बाजीराव भुतेकर, प्रा राकेश खैरनार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सेवानिवृत्ती बद्दल डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच ज्येष्ठ क्रीडा संघटक डॉ. फुलचंद सलामपुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे तलवारबाजी मध्ये नुकत्याच शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित कशिशभराड हिचा देखील याप्रसंगी संघटनेचे वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. उदय डोंगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यांनी तलवारबाजी खेळाचे यशस्वी वाटचाल विशद करत छत्रपती संभाजीनगर हे तलवारबाजी खेळातील भारतामधील प्रमुख केंद्र असल्याचे नमूद केले. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एकूण ४६ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली असून महाराष्ट्र शासनाने ९ खेळाडूंना व १ क्रीडा मार्गदर्शक न शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहेत.येत्या काळात निश्चितच छत्रपती संभाजी नगर चे खेळाडू आशियाई व ऑलम्पिक स्पर्धेमध्ये मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील असा विश्वास व्यक्त केला.आमदार अनुराधा चव्हाण यांनी तलवारबाजी या ऑलिंपिक क्रीडा प्रकाराची छत्रपती संभाजी नगरच्य खेळाडूंचे व छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे कार्य बघून भविष्यात नक्कीच ऑलिंपिक पर्यंत तलवारबाजी चे खेळाडू जातील असा विश्वास व्यक्त केला व यासाठी खेळाडू व संघटनेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचं या ठिकाणी आमदार अनुराधा चव्हाण यांनी नमूद केले. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळाडूंचा मातांच सत्कार छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने केला जातो. याविषयी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील वायसाळ,व प्रा. सागर मगरे यांनी केले तर आभार डॉक्टर दिनेश वंजारे यांनी मानले .

या प्रसंगी सत्कार मूर्ती

.पुष्पा वाघ,कविता लोहिया,अंजली भराड,दिपाली पाटील ,अश्विनी जाधव,रचना शहा,उज्वला बिराजदार,सविता गोटे,स्वप्ना डोंगरे,मोहिनी राऊत,सविता भामरे,सुनंदा जाधव,रोहिणी वंजारे,सीमा जाधव,साधना पाटील,कल्पना क्षीरसागर,ज्योती हुळसुरकर,मनीषा वंजारे,आशा झोंड,जयश्री थोरात,मनीषा वानखेडे,अनिता अवचार,सारिका वाघमारे,रेणुका कुलकर्णी,जयश्री जाधव,प्रतिभा वाहूळ,अर्चना ढसाळ,संगीता बोर्डे,शीतल आव्हाड,वैशाली वनारसे,संगीता जाधव,मुक्ता डोंगरे,दिपाली ढवळे ,वैशाली नलावडे,विजया मोईम ,योगिता अंभोरे, सुनंदा जाधव, नीता आहेवाड, लताबाई जाधव,विद्या शिंदे,मायावती लक्कस,वंदना नवघरे,निर्मला गुडेकर,रेणुका बोरकर,अनुराधा सहाने,कल्पना धोंडफळे,भाग्यश्री भिसे,अनिता काळे,ज्योति छल्लाणी,रेखा सोनवणे,शारदा सोनवणे,रीता पडोळसे ,सुनिता गुंडेकर ,चंद्रकला पिंपरे ,नीता जाधव ,राजेश्री डोंगरे, ,शितल वाघ.

Tags: Chhatrapati Sambhaji Nagar districtHonoring the mothers of talented national athletessports marathi news
ShareTweetSend
Next Post

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा;छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक संघास विजेतेपद

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.