• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खेलो इंडिया पदक प्राप्त दहावी व बारावी गुणवंत 30 खेळाडूंचा सत्कार

सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचा स्तुत्य उपक्रम

by pravin
May 24, 2025
in खेलो इंडिया यूथ गेम्स, जिल्हा, पुरस्कार
Reading Time: 1 min read
खेलो इंडिया पदक प्राप्त दहावी व बारावी गुणवंत 30 खेळाडूंचा सत्कार

गुणवंत खेळाडू समवेत महेशजी गादेकर , प्रथमेश इंगळे, सिद्धेश्वर पाटील ,विनोद भोसले , वैजिनाथ हत्तुरे , प्रा.संतोष खेंडे, सुहास छचूरे ,अजित पाटील राजाराम शितोळे ,वसीम शेख गंगाराम घोडके श्रीधर गायकवाड,रवींद्र चव्हाण, प्रबुद्ध चिंचोलीकर

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाच्या वतीने खेलो इंडिया पदक प्राप्त दहावी व बारावी गुणवंत 30 खेळाडूंचा सत्कार वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे प्रथमेश इंगळे यांच्या शुभहस्ते व सोलापूर स्पोर्ट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते महेशजी गादेकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी म्हणून सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील , बेसबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.नगरसेवक सीए विनोद भोसले स्पीड बॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ हत्तुरे , क्रीडा शिक्षक महासंघाचे शहर अध्यक्ष प्रा. संतोष खेंडे , खजिनदार गंगाराम घोडके व सचिव सुहास छंचुरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतामध्ये महेशजी गादेकर यांनी खेळाडू असून मैदानावर प्रॅक्टिस साठी इतका वेळ देऊन तुम्ही इतके चांगले मार्क घेतलात याबद्दल सर्व खेळाडूंचे व पालकांची कौतुक केले व सदैव आम्ही खेळाडूंच्या पाठीशी कायम उभे राहून अशी ग्वाही देखील दिली

तसेच विनोद भोसले यांनी आजपर्यंत दहावी बारावी मधील गुणवंत खेळाडूंचा सत्कार कधी झालेला नाही आज पहिल्यांदा हा सत्कार होतोय यासाठी त्यांनी क्रीडाशिक्षक महासंघाचे कौतुक केले व खेळाडूंनी उत्तरोत्तर प्रगती केली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली ,
क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही पालकांची असते कारण प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला शैक्षणिक सोबत क्रीडा क्षेत्रातही खूप वेळ दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपली प्रगती करून क्रीडा क्षेत्रासोबत त्याला अभ्यासाची जोड असली पाहिजे अशी अपेक्षा वैजिनाथ हत्तुरे सर यांनी व्यक्त केले

या कार्यक्रमासाठी महासंघाचे राज्याचे समन्वयक भारत इंगवले जिल्ह्याचे संचालक विष्णू दगडे ,शहर संघटनेचे कार्याध्यक्ष राजाराम शितोळे ,उपाध्यक्ष वसीम शेख, अजित पाटील , सहसचिव श्रीधर गायकवाड ,रवींद्र चव्हाण, संचालक प्रबुद्ध चिंचोलीकर, विठ्ठल सरवदे ,ओंकार पुजारी हे उपस्थित होते

खेलो इंडिया पदक प्राप्त खेळाडू. आकृती सोनकुसरे ( लॉन टेनिस मध्ये सुवर्णपदक) प्रथमेश कस्तुरे तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक), आदित्य निकते ( तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक) श्रुती चव्हाण (तलवारबाजी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक) ओम अंगडी (राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सहभाग), प्रणिती नागणे (खेलो इंडिया सपट टाकरा मध्ये ब्रांझ पदक)इयत्ता दहावी बारावी गुणवंत खेळाडू स्नेहा घोडके, अथर्व खेंडे, महेश हेडे, नक्षत्र कदम प्रज्वल माळी प्रसाद काटकर किरण दराडे विजयकुमार व्हसुरे,यथार्थ पाटील,श्रवण लंबाटे, महेश तेली समीक्षा वाघमैतर, गौतमी वाघमैतर, सलगर श्रेया , नम्रता टिमगिरे , सार्थक पोकळे ,स्वरित झाडकर, गुरव अर्चित , पवित्रा चांदोडे,कामरान मोहम्मद इक्बालबाल दलाल

Tags: Khelo India felicitates NewsSolapur City Physical Education and Sports Teachers' Federation
ShareTweetSend
Next Post
माथाडी कामगारांच्‍या मुलाने गाजवले खेलो इंडिया, वैभवची सुवर्णासह पदक हॅटट्रिक

माथाडी कामगारांच्‍या मुलाने गाजवले खेलो इंडिया, वैभवची सुवर्णासह पदक हॅटट्रिक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.