छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत इयत्ता नववी मध्पे शिकणारी सेंट लाॅरेन्स शाळेची आरोही उमेश देशपांडे हीने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात ५४२/६०० गुणांची कमाई करीत ज्युनियर गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणी करीता पात्रता मिळवली आहे. अतिशय कमी वयात जबरदस्त कामगिरी केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आरोहीला आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमेधकुमार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्र रायफल संघ, मुंबई यांचे नवोदित नेमबाजांना विशेष प्रोत्साहन मिळते.आरोही छ.संभाजीनगर येथेच पैठण तालुका शुटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या फायर आर्म शुटिंग रेंजवर सराव करते.





