• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 18, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

निवृत्त अधिकारी स्वयंस्फूर्तीने सेवेत दाखल औरंगाबाद क्रीडा अधिकारी कार्यालयचा पैटर्न इतर जिल्ह्यांत हवा : क्रीडा प्रेमींची बोचक टीका

by pravin
April 30, 2022
in अन्य खेळ, बातम्या, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
निवृत्त अधिकारी स्वयंस्फूर्तीने सेवेत दाखल औरंगाबाद क्रीडा अधिकारी कार्यालयचा पैटर्न इतर जिल्ह्यांत हवा : क्रीडा प्रेमींची बोचक टीका
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची वानवा सातत्याने जाणवत असल्याने स्वयंस्फूर्तीने राजाराम दिंडे यांनी घेतलेला हा पुढाकार अभिनंदनीय ठरत आहे. दि. 31 मार्च 2022 या तारखेचे पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिंडे यांचे प्राप्त झाले. विभागीय क्रीडा संकुलामधे  खेळण्याकरिता येणाऱ्या खेळाडूंना भरमसाठ  शुल्कवाढ आणि संकुलाची भाडेवाढ करण्यासाठी आग्रहाची भूमिका असणारे आता ते पुन्हा जिल्हा क्रीडा कार्यालयात रुजू झाले आहेत, तेही विना वेतन. औरंगाबादचा हा पैटरन इतर जिल्ह्यांत राबविण्यात यावा अशी मागणी बहुविध क्रीडा संघटनांनी बोचक टीका केली आहे आमच्या क्रीडा संघटनेचा पदाधिकारी काम करण्यास तयार आहे. त्यांनाही अशी संधी भेटेल का?

मागील 4-5 महिन्यांपासून क्रीडा खात्यात कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने अडचणी निर्माण होत असल्याने स्वयंस्फुर्तीने विना मोबदला कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी पत्र दिले होते.जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी त्या पत्रास मान्यता देऊन त्यांची सेवा विनामूल्य घेत असल्याचे सांगितले.शासकीय कामकाज करत असताना काही कर्मचारी कामचुकारपणा करतात तर काही कर्मचारी निवृत्तीनंतरही उत्स्फूर्तपणे काम करतात याबाबत दिंडे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे अभिनंदन केले.राज्यांतील सर्वच जिल्ह्यांत कर्मचाऱ्यांची वानवा जाणवत आहे, त्यामुळे क्रीडा खात्यातील कर्मचाऱ्यांना नावंदे यांनी आपली सेवा देण्याचे आवाहन केले आहे व रुजू झालेले दिंडे यांचे याप्रसंगी स्वागत करण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे स्पोर्ट्स पॅनोरामा प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाल्या कि  येथील कार्यालयात आस्थापणावर काही अधिकारी अनुपस्थित आहेत,राजाराम दिंडे यांनी विनामोबदला काम करण्याची इच्छा व्यक्त केली, आम्ही रात्रंदिवस एक करून जबाबदारीने कामे करतो, वर्क लोड आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे सेवानिवृत्त अधिकारी यांची मदत घेतली म्हणजे कोणत्याही प्रकारची चुक नाही.  

याविषयी आम्ही लता लोंढे यांना संपर्क साधला असता ते विभागीय उपसंचालक कार्यालयात कार्यरत असून ते नित्य नेमाने काम करत असल्याचे आढळून आले आहे. त्याच बरोबर चंद्रशेखर घुगे यांना संपर्क साधला असता मी  एक महिन्यापासून आजारी असल्याचे कार्यालयास कळवले असून आणि त्याचे सर्व मेडिकल सर्टिफिकेट कार्यालयात दाखल केलेले आहे. आणि पुन्हा रुजू होण्याकरिता कार्यालयास अर्ज केला आहे एक महिना उलटून अर्ज आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सादर केले असून सुद्धा अद्याप त्यावर ही कोणताही ही कारवाही करून कामा करता रुजू करून घेतलेले नाही.

निवृत्त अधिकारी स्वयंस्फूर्तीने सेवेत दाखल औरंगाबाद क्रीडा अधिकारी कार्यालयचा पैटर्न इतर जिल्ह्यांत हवा : क्रीडा प्रेमींची बोचक टीका

या विषयी स्पोर्ट्स पॅनोरामाने सुहास पाटील उपसंचालक क्रीडा विभागीय,औरंगाबाद यांच्या सोबत बोलतना म्हणाले कि “मला याबाबत माहिती नाही, हा विषय जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या अखत्यारीत येत असल्याने दिंडे यांना बोलावून घेतले, ही बाब माझ्या कार्यालयाशी निगडित नाही

तसेच याविषयी स्पोर्ट्स पॅनोरमाने क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना याविषयी विचारणा केली असता ते बोलताना म्हणाले याविषयी मला कोणतीही कल्पना नाही उपसंचालक यांना माहिती विचारून सांगतो या विषयी योग्य ती चौकशी करून माहिती क्रीडा उपसंचालक सुहास पाटील हे देतील.

या थेट नियुक्तीबद्दल असे लक्षात येते की कोणत्याही अधिकाऱ्यांना याविषयी माहिती न देता जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी राजाराम दिंडे याना क्रीडा विभागातील रिक्त पदाला कंटाळून थेट नियुक्ती दिली आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी थेट नियुक्ती देऊ शकतात का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नियुक्ती देऊ शकत असेल तर सर्वत्र महाराष्ट्र राज्यभर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विनावेतन न घेता कामास इच्छुक असणाऱ्या अधिकाऱ्यांना कामास पुन्हा बोलवण्यात यावे असे क्रीडा प्रेमीच्या वतीने बोलण्यात येत आहे.

दिंडेचा कार्यकाळ कसा होता पाहा 

विभागीय क्रीडा संकुलामधे  खेळण्याकरिता येणाऱ्या खेळाडूंना भरमसाठ  शुल्कवाढ आणि संकुलाची भाडेवाढ करण्यासाठी आग्रहाची भूमिका असणारी व्यक्ती म्हणून ओळख आहे याविषयी संघटनांनी बोलतांना असे सांगितले की ,  मध्यमवर्गीय खेळाडू संकुलापासून व खेळापासून दुरावले आहे व  खेळाचे व्यापारीकरण झाले आहे . खेळाचे व्यापारीकरण करण्यास कारणीभूत दिंडे यांना संबोधल्या जाते.

क्रीडा व युवक संचालयाने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी चौकशी समिती नियुक्त केली होती. ही समिती ३ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये प्राथमिक चौकशी करत असताना विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे तीन दिवसांपासून जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंची चौकशी दरम्यान राजाराम दिंडे माजी तालुका क्रीडा अधिकारी हे देखील याप्रसंगी ठाण मांडून होते. राजाराम दिंडेचा चौकशी सोबत कोणता ही संबंध नसतांना या ठिकाणी मदतीकरता दाखल होते.

पाहा

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंना चौकशी दरम्यान मदतीकरता पाठवला विभागीय आयुक्त…

आजवर जे भ्रष्टाचार क्रीडा खात्यात चालले होते ते आजून चालून देण्यात  यावे खेळाचे बाजारीकरण मांडण्याचे पाऊल उचलत असेल तर  शासनाची ही अशा अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची भावना असेल तर असे भ्रष्ट सरकार आम्हाला नको आहे. असे क्रीडा प्रेमी मार्फत बोलण्यात येत आहे. या विषयी  कोणत्या प्रकारची कारवाई होते हे पहाणे औचित्याचे ठरेल.

 

 

 

 

Tags: Sports corruption newsSPORTS NEWS latestSports news live
ShareTweetSend
Next Post

नामदेव शिरगावकरची इंडिया तायक्वांदो बोगस संघटना:उच्च न्यायालय

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.