• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

क्रीडा शिक्षकांची भरती करताना क्रीडा शिक्षक हा खेळाडूच असायला हवा:आ.सतीश चव्हाण

by pravin
March 14, 2022
in अन्य खेळ, नोकरी भरती, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद(प्रतिनिधी): विधी मंडळातील  विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी आज विधान परिषदेत क्रीडा क्षेत्राशी संबंधीत लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत पदवीधर आमदार सतीश चव्हाण सहभाग घेतला. राज्यातील खेळाडूंना उल्लेखनीय कार्याबद्दल ज्यावेळी शासनाचा क्रीडा पुरस्कार दिला जातो त्याच वेळी त्या खेळाडूला शासकीय सेवेत थेट नियुक्ती द्यावी, क्रीडा शिक्षकांची भरती करताना क्रीडा शिक्षक हा खेळाडूच असायला हवा.

यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठुपरावा करून अधिवेशन संपायच्या आधी धोरणात्मक निर्णय घ्यावा, राज्यात विविध तालुक्याच्या ठिकाणी दीड-दोन कोटी रूपय खर्च करून क्रीडा संकुले उभारण्यात आली आहेत. मात्र त्याठिकाणी खेळाडूंसाठी कुठलेच क्रीडा सहित्य उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे हे क्रीडा संकुले पांढरा हत्ती ठरू नये यासाठी क्रीडा संकुलांच्या उद्‌घाटनाआधीच सर्व क्रीडा साहित्य त्याठिकाणी उपलब्ध करून द्यावे,

तसेच तेथे क्रीडा प्रशिक्षकांची देखील नियुक्ती करावी अशा विविध मागण्यांव्दारे मी सभागृहाचे लक्ष वेधले.क्रीडा मंत्री सुनीलजी केदार यांनी शासनाचा क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नोकरी देण्यासंदर्भात दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्याचे सभागृहास आश्वस्त केले. तसेच जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष हे यापूर्वी जिल्हाधिकारी असायचे, त्यात शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन यापुढे जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असणार आहेत. त्यामुळे डीपीडीसीच्या माध्यमातून तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी आवश्यक ते क्रीडा साहित्य उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे देखील क्रीडा मंत्री सुनीलजी केदार यांनी सभागृहात सांगितले.

 

तर क्रीडा राज्य मंत्री आदितीताई तटकरे यांनी क्रीडा विभागाने जो प्रस्ताव ठेवला आहे त्यात शासकीय सेवेत थेट नियुक्ती अथवा 5 टक्के आरक्षणानुसार नियुक्ती मिळणार्‍या खेळाडूंना तालुका क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत केले जाणार असल्याचे सभागृहात सांगितले.

Tags: MLA Satish ChavanSports teacher should be a player while recruitingsports teachers
ShareTweetSend
Next Post

चॅम्पियन संघ ठरला मास्टर्स ट्रॉफी -2022 चा मानकरी;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.