• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भारतीय महिला संघाचा स्पेनकडून ३-४ असा पराभव;

by pravin
February 28, 2022
in हॉकी
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भुवनेश्वर – भारतीय महिला संघाची प्रो हॉकी लीगमधील विजयाची मालिका रविवारी खंडित झाली. अखेरच्या मिनिटाला झांटल गिनेने केलेल्या गोलमुळे स्पेनने भारतावर ४-३ असा निसटता विजय मिळवला.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारताने शनिवारी स्पेनला २-१ असे नमवले होते. मात्र रविवारी स्पेनने या पराभवाची परतफेड केली. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या स्पेनकडून बेगोना गार्सियाने (चौथे, २४वे मिनिट) दोन, तर मायालेन गार्सिया (१५वे मि.) आणि गिने (६०वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचे तीन गोल पदार्पणवीर संगीता कुमारी (१०वे मि.), सलिमा टेटे (२२वे मि.) आणि नमिता टोप्पो (४९वे मि.) यांनी केले. घरच्या मैदानावर खेळताना स्पेनला पराभूत करत शनिवारी भारताने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली.

या सामन्याच्या चौथ्या मिनिटाला बेगोना गार्सियाने केलेल्या गोलमुळे स्पेनने १-० अशी आघाडी घेतली. सहा मिनिटांनंतर संगीता कुमारीने अप्रतिम वैयक्तिक गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मात्र पेनल्टी कॉर्नरवर मायालेन गार्सियाने गोल केल्यामुळे पहिल्या सत्राअंती स्पेनला २-१ अशी आघाडी मिळाली. पिछाडीवर पडलेल्या भारताने दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना २२व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा सलिमा टेटेने गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. परंतु बेगोना गार्सियाने २४व्या मिनिटाला गोल केल्याने स्पेनला मध्यांतराला ३-२ अशी आघाडी मिळाली. उत्तरार्धातही सामन्यात चुरस कायम राहिली. ४९व्या मिनिटाला टोप्पोने गोल करत भारताला पुन्हा ३-३ अशी बरोबरी साधून दिली. मात्र अखेरची ३५ सेकंद शिल्लक असताना स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि गिनेने यावर गोल करत आपल्या संघाला ४-३ असा विजय मिळवून दिला.

Tags: -womenHockeyIndian
ShareTweetSend
Next Post

ह्यालाच म्हणतात आत्मविश्वास..! नक्की वाचा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.