• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा:टेबल टेनिस मध्ये श्रीगणेशाची महाराष्ट्राला अपेक्षा

by pravin
September 19, 2022
in टेबल टेनिस, बातम्या, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

सूरत-  सानील शेट्टी, दिया चितळे, रवींद्र कोटियन, रीथ रीशा यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस मध्ये सांघिक विभागात सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.‌या स्पर्धेतील सांघिक लढतींना आज येथील आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियम मध्ये प्रारंभ होत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय ठरली आहे. यंदाही तोच वारसा पुढे ठेवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

महाराष्ट्राच्या पुरूष संघाचे व्यवस्थापक श्रीराम कोनकर यांनी सांगितले की, शेट्टी व कोटियन यांच्याबरोबरच सिद्धेश पांडे, दीपित पाटील, रिगन अलबुकर्क हे देखील अव्वल दर्जाचे खेळाडू मानले जातात त्यामुळे आम्हाला चांगल्या यशाची खात्री आहे. या खेळाडूंनी भरपूर सराव केला आहे तसेच स्थानिक स्तरावरील स्पर्धांमध्येही त्यांची कामगिरी कौतुकास्पद झाली आहे. साखळी गटात आम्हाला पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश व कर्नाटक यांचे आव्हान असणार आहे.

महाराष्ट्राच्या महिला संघाच्या प्रशिक्षक ममता प्रभू यांनी सांगितले, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिया चितळे व रीत रिशा यांना परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली आहे. या अनुभवाचा फायदा त्यांना येथील स्पर्धेत निश्चितपणे मिळेल. त्यांच्याबरोबरच अनन्या बसाक, स्वस्तिका घोष व श्रुती अमृते यांच्याकडूनही सर्वोत्तम कामगिरीची आशा आहे. साखळी गटात आम्हाला गुजरात, तेलंगणा व हरियाणा यांच्याबरोबर सामने खेळावयाचे आहेत. आमच्या खेळाडूंची तयारी चांगली झाली असल्यामुळे आम्हाला या संघांविरुद्ध विजय मिळवण्यात अडचणी येणार नाहीत.

Tags: 36th National Sports Tournament News36th National Sports Tournament: Maharashtra hopes for Shri Ganesha in table tennisTABLE TENNIS
ShareTweetSend
Next Post
रन फॉर युनिटी’मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेटमंत्री, आमदार सह विरोधीपक्ष नेते,लोकसभा खासदारची दांडी

रन फॉर युनिटी’मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेटमंत्री, आमदार सह विरोधीपक्ष नेते,लोकसभा खासदारची दांडी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.